NASA Moon Mission Orion Nasa Historic Mission End With Splashdown In Pacific Ocean


NASA Mission Moon : अमेरिकन अंतराळ संस्था नासाचं (NASA) ‘मिशन मून’ (Moon Mission) पूर्ण झालं आहे. नासाचं ओरियन (Orion) अंतराळयान चंद्राभोवतीची (Moon) प्रदक्षिणा पूर्ण करून 26 दिवसांनी पृथ्वीवर (Earth) परतलं आहे. नासाच्या आर्टेमिस-1 (Artemis 1) मोहिमेदरम्यान ओरियन (Orion) रॉकेट चंद्रावर पाठवण्यात आलं होतं. नासाचं मिशन मून (Mission Moon) हे अमेरिकेचे मोठे पाऊल मानलं जात आहे. ओरियन कॅप्सूलने (Orion Capsule) पृथ्वीच्या वातावरणात मध्यरात्री प्रवेश केला. मोठ्या आवाजासह ओरियन पृथ्वीच्या वातावरणात शिरलं आणि प्रशांत महासागरात (Pacific Ocean) कोसळलं. जमिनीवर कोसळताना याचा वेग कमी करण्यासाठी पॅराशूटचा वापर करण्यात आला.

नासाची ‘आर्टेमिस आय’ मोहिम (NASA NASA Artemis I Moon Mission

‘आर्टेमिस आय’ (Artemis I) असं नासाच्या या चंद्रयान मोहिमेचं नाव आहे. ‘आर्टेमिस आय’ (Artemis I) हे नासाची चाचणी मोहीम आहे. भविष्यात चंद्रावर मानवाला पाठवण्याआधी नासाकडून ‘आर्टेमिस आय’ (Artemis I) मोहीमेद्वारे चाचणी करण्यात येत आहे.  नासाच्या स्पेस लॉन्च सिस्टम (SLS) रॉकेटमधून ओरियन कॅप्सूल चंद्राच्या कत्रेत पाठवण्यात आलं होतं.

News Reels

मानवाला चंद्रावर पाठवण्यापूर्वी ही एक चाचणी आहे. ‘आर्टेमिस आय’मधून ओरियन कॅप्सूल (Orion Crew Capsule) द्वारे पुतळे पाठवण्यात आले होते. या पुतळ्यांच्या आधारे मानवासाठीचं निरिक्षण आणि संशोधन केलं जाईल. 

16 नोव्हेंबरला केलं लाँच

ओरियन (Orion) फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून 16 नोव्हेंबर रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. आर्टेमिस-I चे 11 डिसेंबर रोजी मोहिम पूर्ण करत पृथ्वीवर परतलं. 1972 मध्ये याचं दिवशी जीन सेर्नन आणि हॅरिसन श्मिट याचं अंतराळान अपोलो 17 चंद्रावर उतरलं होते. 11 डिसेंबर रोजी या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत.

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरीस (Kamala Harris) यांनी ट्वीट करत नासाचं कौतुक केलं आहे.

Source link

Leave a Comment