Motorola G62 5G Smartphone Has Become Cheaper Know How Much It Costs Now Tech News In Marathi


Moto G62 5G: जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आपल्या Moto G73 5G स्मार्टफोनची किंमत कमी केल्यानंतर आता कंपनीने Moto G62 5G स्मार्टफोनच्या किंमतीही कमी केली आहे. हा फोन कंपनीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच लॉन्च केला होता. लॉन्च केल्यानंतर कंपनीने आता आपला मिड रेंज फोन स्वस्त केला आहे. फोनच्या नवीन किंमतीची माहिती कंपनीने आपल्या अधिकृत साइटवर लिस्ट केली आहे. यूजर्सना आकर्षित करण्यासाठी फोनमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत…

Moto G62 5G किंमत

कंपनीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये Moto G62 5G स्मार्टफोन 2 व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला होता. फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली होती. तसेच याच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत यापूर्वी 19,999 रुपये होती. फोनची किंमत कमी केल्यानंतर आता कंपनीने फोनच्या 6GB रॅम व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये ठेवली आहे. तर  8GB रॅम व्हेरिएंट 3,000 रुपयांच्या कपातीनंतर 16,999 रुपयांना खरेदी करता येईल. फोनमध्ये मिडनाईट ग्रे आणि फ्रॉस्टेड ब्लू कलर पर्याय उपलब्ध आहेत.

Moto G62 5G चे फीचर्स 

Moto G62 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.55-इंच फुल एचडी + डिस्प्ले आहे. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सेल आहे. याशिवाय हा फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ज्यामध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. ज्याला मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते.

फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सर उपलब्ध आहेत. सेल्फीसाठी समोर 16MP कॅमेरा आहे. फोनमध्ये 20W टर्बोचार्जिंग फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे.

Samsung Galaxy M14 5G लॉन्च

दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी Samsung ने Samsung Galaxy M14 5G लॉन्च केला आहे. जो 2023 च्या Galaxy M सीरीजमधील पहिला स्मार्टफोन आहे. मात्र हा फोन अद्याप आपल्या देशात लॉन्च झालेला नाही, तर याला युक्रेनमध्ये लॉन्च करण्यात आलं आहे. लवकरच हा फोन जागतिक बाजारपेठेतही लॉन्च केला जाईल, अशी अपेक्षा आहे. फोनच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर तो Galaxy A14 5G सारखा दिसतो.  A सीरीजचा Galaxy A14 5G कंपनीने वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च केला होता.Source link

Leave a Comment