Moto E13 With 13MP Camera Launched In India, Price Starts At Rs 6,999


Moto E13 with 13MP camera launched: स्मार्टफोन उत्पादक कंपनी Motorola ने आपला नवीन फोन Moto E13 भारतात बजेट फोन रेंजमध्ये लॉन्च केला आहे. हा फोन खास एंट्री-लेव्हल ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे. हा फोन अशा लोकांसाठी बाजारात आणला गेला आहे, ज्यांना वेब ब्राउझ करण्यासाठी, व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी आणि कंटेंट पाहण्यासाठी स्मार्टफोन घ्यायचा आहे. Moto E13 दोन स्टोरेज प्रकारांसह आणि तीन रंग पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस 13-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. हा फोन Android 13 च्या Go व्हर्जनवर काम करतो. गो व्हर्जन हे कमी रॅम असलेल्या फोनसाठी डिझाइन करण्यात आलेले मॉडेल आहे.

Moto E13 with 13MP camera launched: Moto E13 किंमत 

Moto E13 दोन स्टोरेज प्रकारांमध्ये सादर करण्यात आला आहे. दोन्ही स्टोरेज पर्यायांमध्ये तीन रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत. 2GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह बेस स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6,999 रुपये आहे, तर 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 7,999 रुपये आहे. हा फोन फ्लिपकार्ट आणि मोटो स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

Moto E13 with 13MP camera launched: Moto E13 चे स्पेसिफिकेशन 

Moto E13 हे वॉटर आणि डस प्रोटेक्शनसाठी याला IP52-रेट केलेले आहे, जे कमी किमतीत याला एक चांगला पर्याय बनवते. फोनमध्ये 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आणि डॉल्बी स्पीकर आहेत. युजसार फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड वापरू शकतात आणि 1TB पर्यंत स्टोरेज वाढवण्याचा पर्याय देखील फोनमध्ये देण्यात आला आहे. Moto E13 मध्ये ऑक्टा-कोर Unisic T606 प्रोसेसर आणि मागील बाजूस 13-मेगापिक्सेल सिंगल कॅमेरा आहे, जो फुल-एचडी व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे. कॅमेरा मॉड्यूलमध्ये एलईडी फ्लॅशसाठी अतिरिक्त कटआउट देण्यात आला आहे. फ्रंट पॅनलमध्ये वॉटरड्रॉप-स्टाईल नॉचमध्ये 5-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

Moto E13 पर्याय

कंपनीचे म्हणणे आहे ,की हा सेगमेंटमधील सर्वात हलका फोन आहे. Moto E13 चे वजन 180 ग्रॅम आहे. Motorola ने म्हटले आहे की, Moto E13 या सेगमेंटमध्ये अनेक प्रतिस्पर्ध्यांच्या स्मार्टफोनपेक्षा हलका आहे. या सेगमेंटमध्ये काही लोकप्रिय स्मार्टफोन देखील आहेत, ज्यात Samsung Galaxy A03 (211 ग्रॅम), Realme C30 (182 ग्रॅम) आणि Infinix Note 12i (198 ग्रॅम) चा समावेश होतो. जर तुम्ही Moto E13 विकत घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही हे पर्याय देखील पाहू शकता.Source link

Leave a Comment