Moto E13 Amazing Phone Is Coming Soon For Those On A Tight Budget RAM-camera And Battery Are All Great


Moto E13: फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अनेक प्रीमियम स्मार्टफोन लॉन्च (Upcoming Smartphones Feb 2023) होणार आहेत. Samsung Galaxy S23 सीरीज असो किंवा OnePlus 11 5G किंवा 11R हे सर्व फोन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येतील. प्रीमियम मोबाइल फोन्सशिवाय मोटोरोला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बजेट स्मार्टफोन लॉन्च करू शकते. कंपनीने याची अधिकृत घोषणा केली नसली तरी इंटरनेटवर लीक झालेल्या माहितीनुसार मोटोरोला भारतात Moto E13 लॉन्च करू शकते. ज्या लोकांचे बजेट कमी आहे आणि ज्यांना कमी बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी हा मोबाईल फोन सर्वोत्तम पर्याय असेल.

Moto E13: मोबाइल फोनची किंमत

Moto E13 युरोप, आशिया आणि इतर बाजारपेठांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. युरोपमध्ये याची किंमत 119.99 युरो आहे. म्हणजेच भारतीय रुपयानुसार हा फोन 10,600 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आलं आहे. याच किमतीत तो भारतातही लॉन्च केला जाऊ शकतो. तुम्ही कॉस्मिक ब्लॅक, क्रिमी व्हाइट आणि अरोरा ग्रीनमध्ये मोबाईल फोन खरेदी करू शकाल.

Moto E13: स्पेसिफिकेशन

स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, Motorola च्या Moto E13 मध्ये तुम्हाला 6.5-इंचाचा IPS LCD HD Plus डिस्प्ले मिळेल जो 60hz च्या रीफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा मोबाइल फोन Unisoc T606 प्रोसेसरवर काम करेल आणि त्याला 2GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज मिळेल. मोबाईल फोनच्या मागील बाजूस सिंगल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. तर फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. स्टँडबाय मोडमध्ये स्मार्टफोनची बॅटरी 36 तासांपर्यंत चालू शकते. मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

दरम्यान, जर तुमचे बजेट 10,000 रुपये असेल तर तुम्ही या बजेटमध्ये तुमच्यासाठी चांगले स्मार्टफोन खरेदी करू शकता. तुम्ही Samsung Galaxy M04 हा फोन 8,499 रुपयांमध्ये, Lava Blaze 8,699 रुपयांमध्ये, Redmi 9A Sport हा फोन 6,499 रुपयांमध्ये, Redmi 10A 8,999 रुपयांमध्ये आणि Realme Narzo 50i  7,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तुम्ही 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज स्मार्टफोन Techno Spark 9 फक्त 8,999 रुपयांना खरेदी करू शकता. हे सर्व स्मार्टफोन्स अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

इतर महत्वाची बातमी: 

What is GB WhatsApp : डिलीट केलेले मेसेजही ‘या’ व्हॉट्सअॅपवरून वाचता येतात, GB WhatsApp तुमच्यासाठी किती आहे सुरक्षित?Source link

Leave a Comment