Microsoft Surface Duo 3 Microsoft May Launch A Foldable Phone This Year, Know What The Features Will Be


Microsoft Surface Duo 3: काळानुसार तंत्रज्ञान बदलत असून अनेक स्मार्ट गॅजेट्स बाजारात येत आहेत. पूर्वी जिथे फक्त कीपॅड फोन्सच बाजारात उपलब्ध होते, तिथे आता एकापेक्षा एक स्मार्टफोन बाजारात येऊ लागले आहेत. बजेट रेंजपासून ते प्रीमियम आणि फ्लॅगशिपपर्यंत सर्व प्रकारचे स्मार्टफोन आज बाजारात उपलब्ध आहेत. या सर्वांशिवाय गेल्या काही वर्षांत फोल्डेबल फोनही बाजारात पाहायला मिळत आहेत. Samsung, Oppo, Vivo आणि Xiaomi आपले फोल्डेबल फोन बाजारात विकतात. असं असलं तरी फोल्डेबल फोनची किंमत सामान्य स्मार्टफोनच्या तुलनेत जास्त आहे.

दरम्यान, मायक्रोसॉफ्ट आपला फोल्डेबल फोन या वर्षी लॉन्च करू शकते, अशी बातमी आहे. यामध्ये ग्राहकांना उत्तम डिझाइन आणि दर्जेदार कॅमेरा मिळेल, असे सांगितले जात आहे. कंपनी या वर्षी नेक्स्ट जनरेशन Surface Duo 3 (Microsoft Surface Duo 3) लॉन्च करू शकते. हा स्मार्टफोन Microsoft Surface Duo-2 चा अपडेट मॉडेल असेल. मात्र या स्मार्टफोनबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. पण कंपनी या वर्षी आपला फोल्डेबल फोन बाजारात आणणार हे निश्चित आहे. 2021 मध्ये मायक्रोसॉफ्टने आपला Surface Duo 2 मोबाईल फोन सादर केला होता.

Microsoft Surface Duo 3: कसा असेल डिझाइन? 

विंडो सेंट्रलच्या मते, मायक्रोसॉफ्टचा नवा फोल्डेबल फोन दिसायला Vivo X Fold आणि Honor Magic Vs सारखा असू शकतो. म्हणजेच या फोनच्या आतील बाजूस डिस्प्ले आणि बाहेरील बाजूस कव्हर असेल. म्हणजेच हा स्मार्टफोन 180 डिग्री रोटेशनला सपोर्ट करेल. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी हा फोन या वर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये बाजारात सादर करू शकते.

Microsoft Surface Duo 3: या वर्षी लॉन्च होणार हे स्मार्टफोन 

Samsung Galaxy S23
Samsung Galaxy S23 Ultra
Apple iPhone 15
Apple iPhone 15 Pro MAX
OnePlus 11
OnePlus 11R
OnePlus 11 Pro
Xiaomi 13
Xiaomi 13 Pro
Vivo X90
Vivo X90 Pro
Vivo X90 Pro+

news reels

कोरियन कंपनी सॅमसंग आपली s-23 सीरीज 1 फेब्रुवारीला बाजारात लॉन्च करू शकते. कंपनी एस सीरीज अंतर्गत 3 स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. पहिला Samsung Galaxy S23, दुसरा Samsung Galaxy S23 Plus आणि तिसरा Samsung Galaxy S23 Ultra आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोन्सची किंमत 80,000 रुपयांपासून 1,20,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच बेस व्हेरिएंटची किंमत सुमारे 80 हजार असू शकते. तर टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 1,20,000 रुपये असेल.Source link

Leave a Comment