15 marathi bodh katha | मराठी बोधकथा व तात्पर्य

नमस्कार मित्रांनो आपण या पोस्ट मध्ये बरेच marathi bodh katha लिहिले आहेत. ज्या तुम्हाला किंवा तुमच्या लहान मुलांना नक्की आवडणार कारण ह्या कथा सगळ्या लोकांनी एकल्यात असणार कर खूप काही ह्या कथा मधून शिकायला मिळत . लहान मुलांनी तर नक्की वाचायला पाहिजे कारण ह्या बोधकथा तू त्यांना एक प्रेना मिळते. चला तर मग छान अश्या बोध कथा वाचूया.marathi bodh katha

 

marathi bodh katha
marathi bodh katha | उंदीर, कोंबडा आणि मांजर

एका उंदिराचे पिटुकले पिल्लू पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, “”आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच.

रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश्श शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या. दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती.

तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही. हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, “”वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव.”” तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.

तात्पर्य : बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.

 

marathi bodh katha | बुड बुड घागरी

एकदा एका जंगलात उंदीर जातो. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघा मित्रांनी खीर करण्याचे ठरविले. माकड म्हणाले ‘मी साखर आणतो’. मांजर म्हणाले ‘मी दूध आणतो’. उंदीर म्हणाला ‘मी शेवया आणतो’. तिघांनी पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले ‘चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ’.

इकडे मांजराच्या तोंडाला पाणी सुटले होते. ते अर्ध्या वाटेतूनच परत आले. त्याने सगळी खीर खाऊन टाकली. थोडया वेळाने माकड व उंदीर आले. पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे! त्यांनी मांजराला विचारले ‘खीर कोणी खाल्ली?’ मांजर म्हणाले, ‘मला नाही माहीत.’ मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले ‘ हुप हुप करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी’. पण घागर काही बुडाली नाही.

मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला ‘चूं चूं करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी’. पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली. मांजर खरे तर घाबरले होते. कसेबसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले ‘ म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी’. अन काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली

तात्पर्य : कधीही खोटे बोलू नये.

 

marathi bodh katha | चल रे भोपळया टुणुक टुणुक

एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. तिची लेक दुसर्‍या गावाला रहात होती. रस्त्यांत मोठे जंगल होते. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’.

पण म्हातारी होती हुशार. ती म्हणाली, ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग तू मला खा.’ कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले. म्हातारी पुढे निघाली. तिला भेटला वाघ. तो म्हणाला, ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’. त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला म्हणाली ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठमुठ्ठ होते, मग तू मला खा. ‘ वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली.

 

marathi bodh katha | कष्टाचे फळ

एका गावात एक म्हातारा शेतकरी रहात होता. त्याला पाच मुले होती व ती सर्वच्या सर्व खूप आळशी होती त्यांना कष्ट करणे माहितच नव्हते ते फक्त वडिलांच्या पैशांवर मजा करायचे. त्यांच्या मनात नेहमी विचार यायचा की आपण गेल्यानंतर आपल्या आळशी मुलांचे कसे होणार, व त्यांचा संसार कसा चालणार? यावर त्या शेतकऱ्याला एक कल्पना सुचते व ते एके दिवशी आपल्या पाचही मुलांना जवळ बोलवितात व त्यांना सांगतात की आपल्या पूर्वजांनी शेतामधील एक सोन्याच्या नाण्यांनी भरलेला एक हंडा पुरलेला आहे.

मी गावाला गेल्यावर तुम्ही शेत खणा व धन काढून ते आपापसात वाटून घ्या. दुसऱ्या दिवशी तो शेतकरी गावाला गेल्यानंतर त्या पाचही जणांनी सोन्याचा हंडा मिळविण्यासाठी सर्व शेत खणून काढले पण त्यांना सोन्याचा हंडा सापडला नाही. मग त्यांनी विचार केला की एवढे शेत खणले आहे तर यात धान्य पेरावे म्हणून त्यांनी तेथे धान्य पेरले. त्यावेळेस पाऊसही चांगला पडला व त्यांनी पेरलेल्या धान्यामुळे त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले. त्यांनी ते बाजारात जावून विकले व त्यांना भरपूर धन मिळाले.

गावाहून वडील आल्यानंतर त्या पाचही मुलांनी झालेला प्रकार वडीलांना सांगितला. तेव्हा ते बोलले, ‘मी तुम्हाला याच धनाबद्दल सांगत होतो जर तुम्ही अशीच मेहनत केली तर तुम्हाला दरवर्षी असेच धन मिळत राहील.’

तात्पर्य – कष्टाचे फळ हे नेहमी गोड असते

 

marathi bodh katha | मुंगी व कोशातला किडा

एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला. कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हालवीत होता. ते पाहून मुंगी म्हणाली, ‘अरेरे, काय ही तुझी स्थिती ? मला वाटेल तिकडे फिरता येतं. पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात. तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच अंतर आहे असं म्हटले पाहिजे.’ यावर किडा काहीच बोलला नाही. पुढे काही दिवसांनी ती मुंगी पुनः तेथे गेली असता त्या किड्याचे फक्त कवच मात्र तेथे पडले असून तो किडा कोठेतरी निघून गेला आहे असे तिला दिसते. ती इकडे तिकडे फिरत आहे तोच एक सुंदर पतंग आपल्या पंखांनी तिला वारा घालत असताना तिला दिसला. तो तिला म्हणाला, ‘अग, त्या दिवशी बंदिवान म्हणून तू माझी कीव करीत होतीस, माझ्यापेक्षा तुझी स्वतःची स्थिती बरी असं म्हणत होतीस, तोच कोशातला किडा मी आहे हे लक्षात घे. आपल्याला वाटेल तिकडे फिरता येतं अशी बढाई मारायची असेल तर खुशाल मार. तोपर्यंत मी सहज थोडा आकाशात फिरून येतो.’ इतके बोलून त्याने एक भरारी मारली व उंच आकाशात गेला.

 

तात्पर्य– संकटात असलेला माणूस पुनः कधीही वर डोके काढणार नाही अशा समजुतीने त्याचा उपहास करून त्याच्याजवळ स्वतःच्या वैभवाबद्दल बढाई मारणे हा मूर्खपणा होय.

 

marathi bodh katha | बळी तो कान पिळी

एकदा प्राण्यांमध्ये रोगाची साथ सुरू होऊन हजारो प्राणी मरू लागले. आपण फार पाप केल्यामुळे देवाने हा कोप केला आहे असे सर्व प्राण्यांना वाटून त्यांनी आपली वाईट कृत्ये कबूल करायचे ठरविले व जो सर्वात मोठा अपराधी ठरेल त्याने देवाच्या कोपाला शांत करण्यासाठी बळी जावे असे ठरले. ठरल्या वेळी सगळेजण हजर झाले व न्यायाधीशाच्या जागी एकमताने कोल्ह्याची निवड केली गेली. प्रथम सिंहाने पुढे होऊन कबुली दिली, ‘मी फार गरीब कोकरांना ठार मारलं, एवढंच नव्हे तर फार भूक लागल्याने एका धनगरालाही ठार मारून खाल्लं.’ त्यावर न्यायाधीश म्हाराज मोठ्या गंभीरतेने म्हणाले, ‘एखाद्या सामान्य प्राण्याने अशा गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच मोठा अपराध ठरला असता. पण महाराजांना इतरांपेक्षा जास्त सवलती असतात. मूर्ख बकर्‍या नि एकच धनगर खाणं हा काही मोठा अपराध नाही.’ या निकालामुळे हिंस्त्र प्राण्यांनी कोल्ह्याची तारीफ केली. यानंतर वाघ, चित्ता, अस्वल वगैरे प्राण्यांनी आपापल्या कबूली दिल्या व कोल्ह्याने वरीलप्रमाणेच निकाल दिला. शेवटी एक गरीब गाढव पुढे येऊन म्हणाले, ‘एका शेतकर्‍याच्या इनाम जमिनीतलं मूठभर हिरवं गवत मी खाल्लं. आणि त्याबद्दल मला पश्चात्ताप’ काय पश्चात्ताप ?’ न्यायाधीश झालेले कोल्होबा ओरडले. ‘अरे पाप्या नक्कीच तुझ्या पापामुळे सध्या हा देवाचा कोप झालेला आहे. यालाच मरणाची शिक्षा योग्य आहे !’ असा निकाल कोल्होबांनी देताच सगळ्यांनी मिळून त्या बिचार्‍या गाढवाला ठार मारले.

तात्पर्य– बळी तो कान पिळी.

 

marathi bodh katha | वेळेचे महत्त्व

एक स्वार आपल्या घोड्याला खरारा करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले. पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले. काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला. त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की, ‘सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा.’ हुकमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याचा नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला. लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले.

तात्पर्य – जेव्हाचं काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे.

 

marathi bodh katha | स्वार्थी मांजर

एका मांजराने आपल्या मालकाचा आवडता पोपट मारून खाल्ला. तेव्हा मालकाने, ‘ते मांजर दिसले तर मारून टाकीन’ असे रागाने म्हटले. ते ऐकताच मांजर इतके घाबरले की ह्या प्रसंगातून देवाने आपल्याला वाचविले तर पुढे आपण कोणताही पक्षी कधीही मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली. थोड्या वेळाने दिवाणखाण्याच्या खिडकीतून एक वटवाघूळ अचानक आत आले ते पाहून असल्या मोह उत्पन्न करणार्‍या प्रसंगी कोणत्या प्रकारचे वर्तन करावे हा प्रश्न मांजराला पडला. एकीकडे भूक व दुसरीकडे प्रतिज्ञाभंग होण्याची भिती अशा पेचात ते सापडले असता काही वेळाने आपली भूक भागविण्याची एक युक्ती त्याला आढळून आली. वटवाघूळाकडे पाहून ते आपल्याशीच म्हणाले, ‘हा पक्षी आहे असं जर मानलं तर केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे याला हात लावण्याचा अधिकार मला नाही, पण याच्या तोंडाचं उंदराच्या तोंडाशी इतकं साम्य आहे की, याला मारून खाण्याचा अधिकार मला आहे.’ इतके बोलून तिने त्या वटवाघूळाला खाऊन टाकले.

 

तात्पर्य– स्वार्थ साधण्याची वेळ आली असता लबाड लोक आपली प्रतिज्ञा युक्तीने गुंडाळून ठेवतात

 

marathi bodh katha | सेवा हाच धर्म

एका पत्रकारांनी स्वा:मी विवेकानंदांची कीर्ती ऐकलेली होती. स्वाचमी विवेकानंदांना भेटून त्यांतच्यााकडून चार ज्ञानाच्याी गोष्टीह शिकाव्याात अशी त्यांकची तीव्र इच्छाक होती.

त्यां पत्रकारांचे दोन मित्र त्यां्ना भेटावयास आले व बोलता-बोलता स्वायमी विवेकानंदांचा उल्लेतख निघाला. तिघांनी विवेकानंदांना भेटायला जाण्याटचे ठरविले. तिघेही मिळून स्वावमीजींकडे गेले. विवेकानंदांनी तिघांचीही आस्थेिने विचारपूस केली.

यादरम्यादन स्वाआमीजींना असे कळाले की तिघेही पंजाब प्रांतात राहणारे आहेत. त्याा काळात पंजाबात दुष्कातळ पडलेला होता. त्यां नी त्याासंदर्भात चर्चा केली. दुष्कांळग्रस्तांडसाठी चाललेल्याा मदतकार्याची माहिती घेतली. त्याहनंतर शैक्षणिक, नैतिक आणि सामाजिक बाबींवर चर्चा केली. ब-याच वेळ चर्चा झाल्या.नंतर तिघेही निघाले.

निघताना पत्रकार महाशय विवेकानंदांना म्हंणाले,”स्वा मीजी, आम्हीच तुमच्यांकडे धार्मिक उपदेश मिळेल या उद्देशाने आले होतो. पण तुम्हीण मात्र सामान्य‍ अशा बाबींवरच चर्चा केलीत. आम्हाबला यातून ज्ञानवर्धक असे काहीच मिळाले नाही.” या स्वारमी विवेकानंदांनी मोठे मार्मिक उत्तर दिले ते असे की,” मित्रवर्य, जोपर्यत या देशात एक जरी मूल उपाशी राहिले तर धर्माची चर्चा करण्या पेक्षा त्यावची भूक कशी भागवता येईल हे पाहणे जास्तउ महत्वारचे आहे. ज्याआचे पोट भरलेले नाही त्यााला धर्मोपदेश देण्याभपेक्षा भाकरी देणे हे महत्वााचे आहे. रिकाम्या. पोटी तत्वज्ञानाचा उपदेश उपयोगी नाही.

 

लहान मुलांच्या मराठी गोष्टी | Marathi Stories For Kids

शौर्याचा पुरावा – marathi bodh katha

बादशहा अकबराचा दरबार भरला होता. तेवढयात द्वारपालाने येऊन सांगितले की, बाहेर दोन राजपूत युवक आले आहेत. ते राजाला काही सांगू इच्‍छितात. अकबराने त्‍यांना दरबारात हजर करण्‍याची आज्ञा केली. ते दोन्‍ही युवक अगदी सुदृढ, पिळदार शरीरयष्‍टीचे होते. त्‍यांच्‍या हातात ढाल व तलवार होती. अकबराने त्‍यांना बोलण्‍याची परवानगी दिली. ते म्‍हणाले, ‘’ आम्‍ही राजपूत आहोत, आमची तुम्‍हाला विनंती आहे की, आम्‍हाला तुमच्‍या सैन्‍यात स्‍थान द्यावे. शौर्य व साहस दाखविता येईल अशी जबाबदारी सोपवावी.’’ अकबराने त्‍यांना विचारले, मी तुमच्‍यावर विश्‍वास कसा ठेवायचा? तुम्‍ही शुरवीर आहात याचे काही प्रमाण आम्‍हाला द्याल काय? दोघेही म्‍हणाले, ‘’पुरावा, प्रमाण म्‍हणजे आम्‍हाला माहितच नाही. आम्‍ही केवळ काम करणे एवढेच जाणतो.’’हे ऐकल्‍यावर बादशहाचा रागाचा पारा चढला, संतापाने तो म्‍हणाला,’ तर मग तुम्‍ही शूर नाही आहात मुळी, आपण मोठे वीर असल्‍याचा आव आणत आहात पण खरे शूर नाहीत. शूर असल्‍याच्‍या बाता मारणा-यांसाठी हा दरबार नाही.’’ बादशहाचे हे आव्‍हानात्‍मक भाषण ऐकून त्‍या दोघांनी देवी भवानीचे स्‍मरण केले व आपल्‍या तलवारी बाहेर काढल्‍या. दोघांनीही बराच वेळ तलवारबाजीचे कसब दाखविले. दोघांच्‍याही तलवारीतुन अक्षरक्ष: ज्‍वाळा बाहेर पडत होत्‍या. दोघांपैकी कुणीच मागे हटत नाही असे दिसत होते.शेवटची चढाई करायची म्‍हणून दोघांनीही ‘जय भवानी’ चा जयघोष केला. एकमेकांच्‍या मानेवर वार करण्‍यासाठी तलवारी सरसावल्‍या. उपस्थित मंडळी श्‍वास रोखून पाहत होती. पहिल्‍याने दुस-याच्‍या मानेवर वार केला, तो पडण्‍याच्‍या बेतात असताना त्‍यानेही तसेच प्रत्‍युत्तर त्‍याला दिले. बादशहा जागेवरून उठून धावला, मरताना ते दोघे म्‍हणाले, राजन, आम्‍ही जन्‍म-मृत्‍युमध्‍ये काहीच अंतर मानत नाही. तुम्‍ही पुरावा मागितला, वीरांकडे शौर्याचा कसला पुरावा मागता? आम्‍ही तर संधी मिळताच तलवारीच्‍या टोकाला मरण बांधून जगत असतो. अकबराला त्‍याच्‍या कृतीचा पश्‍चाताप झाला. त्‍याने त्‍या दोघांच्‍या कलेवराला कुर्निसात केला.

तात्‍पर्य-शूरवीर कर्माने नंतर, आधी वाणी, विचार व आचरणातून ओळखले जातात. 

 

सकारात्मक बोधकथा | Moral Stories In Marathi

 

एक गरीब माणूस मोठ्या कष्टाने प्रत्येक रुपयाची भर घालून घर बांधतो. ते घर बांधण्यासाठी गेल्या 20 वर्षांपासून तो प्रत्येक पैसा वाचवत आहे, जेणेकरून त्याच्या कुटुंबाला छोट्या झोपडीतून बाहेर पडून कायमस्वरूपी घरात आनंदाने राहता येईल.

शेवटी, एक दिवस घर बांधले जाते आणि तयार होते. त्यानंतर, पुजार्‍याला विचारून घराच्या तापमानवाढीसाठी एक शुभ तारीख निश्चित केली जाते, परंतु घराच्या तापमानवाढीच्या दोन दिवस आधी भूकंप होतो आणि त्याचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त होते.

जेव्हा त्या माणसाला ही बातमी कळते तेव्हा तो बाजारात धावतो आणि मिठाई विकत घेऊन येतो. मिठाई घेऊन तो घटनास्थळी पोहोचला, जिथे बरेच लोक जमले होते आणि घर कोसळल्याबद्दल दु:ख व्यक्त केले.

अरेरे! बिचार्‍याचे फार वाईट झाले, किती कष्टाने एक-एक पैसा जोडून घर बांधले. तसेच लोक आपापसात वेगवेगळ्या गोष्टी बोलत होते.

तो माणूस तिथे पोहोचतो आणि पिशवीतून मिठाई काढतो आणि सर्वांना वाटू लागतो. हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा त्याचा एक मित्र त्याला म्हणतो, तू वेडा झाला आहेस का, घर उद्ध्वस्त झाले आहे, तुझ्या आयुष्यभराची कमाई वाया गेली आहे आणि तू आनंदाने मिठाई वाटप करतोस.

तो माणूस हसून म्हणतो, _ तुम्हाला या घटनेची फक्त नकारात्मक बाजूच दिसत आहे, त्यामुळे तुम्हाला त्याची सकारात्मक बाजू दिसत नाही. आजच घर कोसळलं हे खूप चांगलं आहे, नाहीतर तुम्हाला वाटतं की हे घर 2 दिवसांनी कोसळलं असतं तर मी, माझी बायको आणि मुले सगळेच मारले गेले असते तर किती मोठे नुकसान झाले असते.

नकारात्मक वृत्ती सोडून द्या, तुमच्या घरातील लहान मुलांना आणि मोठ्यांना सांगा – “तुम्ही निरोगी राहा, आम्ही तुम्हाला आनंदी ठेवू”.

प्रत्येक माणूस सकाळी उठून प्लॅन करतो की आज 2 वाजता मी तिकडे जाईन, आज 4 वाजता मी त्याला भेटेन, तर पुढच्या क्षणाचा भरवसा नसतो. सकाळी उठून मनात विचार करा की “श्री हरी इच्छा, बघा देव आज काय करतो, दिवस कसा जातो.”

मला कुणीतरी विचारलं की तू नेहमी एवढा समाधानी आणि आनंदी कसा राहतोस, तर मी म्हणालो – “मी जे विचार केले ते घडते, मी आनंदी आणि आनंदी आहे, जर माझा विचार झाला नाही तर बाप म्हणून देव मला यापेक्षा चांगले काहीतरी देईल. म्हणूनच ते अजून झाले नसते.

असा विचार करून मी अधिकच मस्त आणि आनंदी झालो.ते माझ्यासाठी चांगलं नसावं म्हणून देवाने ते होऊ दिलं नाही!

 

 

उपदेशात्मक कथा – दोषी कोण आहे

व्यापारी जहाजाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी परतत होता.अचानक समुद्राच्या लाटा उसळल्या!

प्रचंड लाटांचा गडगडाट एखाद्या प्राण्याच्या भयंकर गर्जनासारखा वाटत होता!काही वेळाने जहाजाचा तोल गेला आणि ते एका खडकावर आदळले.

त्या धडकेने जहाजाचे तुकडे झाले!विमानातील सर्व प्रवासी ठार झाले मात्र एक जण बचावला.तो बेशुद्ध होता! शुद्धीवर आल्यावर तो ओरडला आणि म्हणाला, “प्रथम तुम्ही तुमच्या शांत लहरींनी व्यापाऱ्यांना गोंधळात टाकले आणि प्रभावित केले!जेव्हा ते अर्ध्या वाटेवर पोहोचले, तेव्हा तुम्ही त्यांना मोठ्या जंगली प्राण्यासारखे खाल्ले! निष्पाप जीव घेऊन काय मिळालं? असे म्हणत तो रडू लागला.तेव्हा समुद्र मुलीच्या रूपात प्रकट झाला आणि म्हणाला, “मला दोष देऊ नका.माझा स्वभाव शांत आहे! पण मी काय करू? हे जोरदार वादळी वारे माझी परवानगी न घेता माझ्यावर हल्ला करतात! ,खरा गुन्हेगार आहे तो जोरदार वादळी वारा!

 

निष्कर्ष:या बोधकथेतून आपण शिकतो की आरोप करण्यापूर्वी खरा गुन्हेगार कोण आहे हे शोधून काढले पाहिजे.

 

 

BodhKatha Marathi PDF

 

तर नक्की वाचायला मजा आली असणार आमच्या ह्या पोस्ट मध्ये marathi bodh katha तुम्हाला कोणती  कथा आवडली नकी सांगा.

 

Leave a Comment