LinkedIn Report Shows 61% Of The Indian Workforce Say They Will Only Share Their Pay Information With A Family Member


India : पगार… किंबहुना स्वतःपेक्षाही इतरांचा पगार, हा अनेक जणांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. हीच बाब लक्षात घेऊन लिंक्डइन (LinkedIn) या जगातल्या सर्वात मोठ्या ऑनलाईन प्रोफेशनल नेटवर्कने आज त्यांच्या वर्कफोर्स कॉन्फिडन्स इंडेक्सच्या नवीनतम आवृत्तीतून सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून भारतातील 4,684 कर्मचाऱ्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मिळालेल्या प्रतिसादाच्या आधारे 4 जून ते 9 सप्टेंबर 2022 दरम्यान असे दिसून आले आहे की, कामाच्या ठिकाणी वेतनाची (पगाराबाबत) माहिती देणे हे भारतात निषिद्ध (taboo) मानले जाते. तसेच, 10 पैकी फक्त 1 कर्मचारी म्हणतात की, ते त्यांच्या पगारावर विश्वास असलेल्या सहकार्‍यांशी चर्चा करतील.

अहवालात असे दिसून आले आहे की, भारताचा एकूण कर्मचारी आत्मविश्वास किंचित कमी झाला आहे. संयुक्त स्कोअर (composite score dropping) जुलै मधील +55 वरून सप्टेंबर 2022 मध्ये +52 पर्यंत घसरला आहे. याचं कारण नोकरी, वित्त आणि करिअरच्या प्रगतीबद्दल असलेली अनिश्चितता हे याचे मुख्य कारण आहे. अहवालात असेही आढळून आले आहे की, एकूणच आत्मविश्वास कमी असूनही, भारताचे कर्मचारी या आव्हानांना नेव्हिगेट करण्याबाबत आशावादी आहेत. कारण 10 पैकी 7 कर्मचारी म्हणतात की, त्यांना त्यांच्या क्षेत्रात (74%), त्यांचा कार्य अनुभव आणि शिक्षण (71%) पुढील स्तरावर पोहोचण्याचा विश्वास आहे. 

कुटुंब, मित्र आणि त्यांचा विश्वास असलेल्या सहकार्‍यांशी पगारावर चर्चा करताना जनरल Z कर्मचाऱ्यांना सर्वात सोयीस्कर वाटते

संबंधित निष्कर्ष असे दर्शवितात की, भारतातील 61% कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन तपशील कुटुंबातील सदस्यांसह शेअर करणे अधिक सोयीस्कर वाटते. तर 25% त्यांच्या जवळच्या मित्रांसह पगाराबाबत माहिती शेअर करतात. राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत, भारतातील तरुण पिढी  कुटुंब आणि मित्रांसह त्यांच्या वेतनाची माहिती शेअर करतात.

सुमारे 72% Gen Z आणि 64% भारतातील लोक म्हणतात की, ते त्यांच्या पगाराची माहिती कुटुंबातील सदस्यांसह शेअर करण्यास सोयीस्कर आहेत. तर, 43% Gen Z आणि 30% लोक त्यांच्या जवळच्या मित्रांमध्येही शेअर करतात. अहवालात असेही आढळून आले आहे की, Gen Z (23%) व्यावसायिक त्यांच्या पगाराची माहिती त्यांच्या विश्वास असलेल्या सहकार्‍यांसह सामायिक करतात, त्यापाठोपाठ Millennials (16%) आणि Gen X (10%) माहिती देतात.

मिळालेल्या माहितीनुसार असे दिसून येते की, “कर्मचाऱ्यांंना कामाच्या ठिकाणी पगाराबद्दल संभाषण करणे अद्यापही सोयीचे वाटत नाही. तर, लिंक्डइन वर्कफोर्स कॉन्फिडन्स इंडेक्स डेटावरून असे दिसून येते की, आजची पिढी बदलत चालली आहे. पगाराबाबत माहिती शेअर करण्यास सर्वात जवळची विश्वासू व्यक्ती म्हणजे कुटुंब आणि मित्र मंडळी. सध्याच्या तरुण व्यावसायिकांची पिढी इतर पिढ्यांच्या तुलनेत त्यांच्या सहकार्‍यांसह आणि उद्योगातील समवयस्कांसह पगाराची माहिती सामायिक करण्यास अधिक इच्छुक आहेत. खरं तर, इतर कोणत्याही वयोगटाच्या तुलनेत जनरल झेड प्रोफेशनल्स त्यांच्या संपूर्ण नेटवर्कमध्ये त्यांचे वेतन शेअर करण्याची सर्वाधिक शक्यता असते. या संदर्भात निराजिता बॅनर्जी, भारताच्या व्यवस्थापकीय संपादक, LinkedIn News यांनी सांगितल्यानुसार, जनरल झेड बदलांवर प्रभाव टाकण्यास उत्सुक आहेत आणि कामाच्या ठिकाणी या संभाषणांचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहेत.

मिलेनिअल्सना पगारावर चर्चा करण्याबाबत निराश आणि चिंता वाटते

कामाच्या ठिकाणी पगाराची माहिती शेअर करणे निषिद्ध का मानले जाते या कारणास्तव अधिक खोलवर जाऊन पाहिल्यास, अहवालात असे आढळून आले आहे की, भारतातील 45% व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, त्यांच्या कामाच्या ठिकाणी समवयस्कांमध्ये वेतनाच्या चर्चेला taboo केले जाते. Millennials (48%) आणि Gen X व्यावसायिक (47%) या विधानाशी सहमत आहेत.

भारतातील 36% कर्मचाऱ्यांनी असेही म्हटले आहे की, त्यांना त्यांच्या वेतनाची माहिती कोणासोबतही शेअर करण्यात चिंता वाटते. यापैकी Gen Z (33%) किंवा Gen X (32%) कर्मचाऱ्यांच्या तुलनेत मिलेनियल लोकांना ही चिंता (42%) जाणवण्याची अधिक शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या : 

LIC Scheme: पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यानंतर LIC भरणार प्रीमियम, जाणून घ्या प्लानSource link

Leave a Comment