LIC HFL Apprenticeship Recruitment 2023

 

LIC HFL Apprenticeship Recruitment 2023 : पदवीधर (Graduate) आहात आणि चांगली नोकरी (Job Alert) मिळण्याची वाट पाहत असाल तर, ही बातमी काळजीपूर्वक वाचा. नोकरीची चांगली संधी चालून आली आहे. एलआयसीमध्ये नोकरीची संधी आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये बंपर भरती सुरु आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये शिकाऊ पदांसाठी इच्छुक उमेदरावारांचे अर्ज मागवले आहेत.

 

Lic मध्ये 250 पदांवर बंपर भरती चालू आहेत.

या भरतीअंतर्गत एकूण 250 शिकाऊ उमेदवारांची भरती (LIC HFL Apprenticeship Recruitment 2023) केली जाणार आहे. https://www.lichousing.com या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. महत्त्वाचं म्हणजे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे, त्यामुळे वेळ वाया न घालवता लगेचच अर्ज दाखल करा.

 

LIC HFL Apprenticeship Recruitment 2023 Last Date : महत्त्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख : 22 डिसेंबर 2023

 

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023

 

LIC HFL Apprenticeship Recruitment 2023 : रिक्त जागांचा तपशील

या भरतीअंतर्गत एकूण 250 पदांवर शिकाऊ उमेदवार पदावर भरती केली जाईल. प्रशिक्षणाचा कालावधी 12 महिन्यांचा असेल.

 

LIC HFL Apprenticeship Recruitment 2023 : वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 25 वर्षे दरम्यान असावे. या भरतीसाठी पात्र उमेदवाराने 1 डिसेंबर 2023 ते 1 एप्रिल 2020 या काळात पदवी शिक्षण पूर्ण केलेले असावे. अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना वाचा, येथे क्लिक करा.

 

LIC HFL Apprenticeship Recruitment 2023 : निवड कशी केली जाईल?

अधिकृत अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आधी प्रवेश परीक्षेला बसावं लागेल. 6 जानेवारी 2024 रोजी भरतीसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारां कागदपत्र पडताळणी आणि वैयक्तिक मुलाखतीला उपस्थित राहावं लागेल. 9 जानेवारी ते 11 जानेवारी 2024 या कालावधीत मुलाखतघेतली जाणार आहे.

 

LIC HFL Apprenticeship Recruitment 2023 : किती स्टायपेंड दिला जाईल?

या पदांवरील उमेदवारांना शहराच्या श्रेणीनुसार स्टायपेंड मिळेल. शहर श्रेणी 1 साठी निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना 15000 रुपये स्टायपेंड दिले जाईल. तर शहर श्रेणी 2 साठी निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना 12000 रुपये स्टायपेंड मिळेल. तसेच, शहर श्रेणी 3 साठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 9,000 रुपये स्टायपेंड दिले जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.

 

या भरतीसाठी अर्ज करण्याची डायरेक्ट लिंक, येथे क्लिक करा.

Leave a Comment