Kusumagraj marathi kavita, कुसुमाग्रज यांच्या काही प्रसिद्ध कविता,

 

Kusumagraj Information in Marathi | वि वा शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचे जीवनचरित्र 

कुसुमाग्रज, ज्यांचे खरे नाव विष्णू वामन शिरवाडकर होते, ते महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मराठी कवी, लेखक आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुणे, महाराष्ट्र येथे झाला आणि 10 मार्च 1999 रोजी त्यांचे निधन झाले.

 कुसुमाग्रजांना मराठी साहित्यातील दिग्गजांपैकी एक मानले जाते आणि 20 व्या शतकाच्या मध्यात उदयास आलेल्या “व्हॅनगार्ड” किंवा “प्रगतशील” साहित्य चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व मानले जाते. मराठी कवितेचे आधुनिकीकरण करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि मराठी साहित्यात नवीन विषय आणि रूपे आणली.

 त्याची काव्य शैली त्याच्या तीव्र भावना, समृद्ध शब्दसंग्रह आणि विचार करायला लावणारी थीम द्वारे वैशिष्ट्यीकृत होती. निसर्ग, प्रेम, सामाजिक समस्या आणि देशभक्ती यासह विविध विषयांवर त्यांनी लेखन केले. ‘विशाखा’, ‘नटसम्राट’, ‘विदुषक’ आणि ‘अर्धशिखारी’ या त्यांच्या काही प्रसिद्ध कामांचा समावेश आहे.

 कुसुमाग्रज हे केवळ विपुल कवीच नव्हते तर ते प्रभावी निबंधकार, समीक्षक आणि नाटककार होते. मराठी साहित्यातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान), आणि पद्मभूषण (भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक) यासह अनेक पुरस्कार आणि पुरस्कार मिळाले.

 कुसुमाग्रज त्यांच्या साहित्यिक कार्याव्यतिरिक्त सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रियपणे सहभागी होते. शिक्षणाचा प्रसार, सामाजिक दुष्कृत्यांचे निर्मूलन आणि राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्यासाठी ते वचनबद्ध होते. त्यांच्या लेखनातून अनेकदा सामाजिक न्याय आणि समाजाच्या उन्नतीसाठी त्यांची चिंता दिसून येते.

 मराठी साहित्य आणि संस्कृतीवर कुसुमाग्रजांचा प्रभाव त्यांच्या निधनानंतरही जाणवत आहे. त्यांच्या कविता आणि लेखन पिढ्यानपिढ्या वाचक आणि लेखकांना प्रेरणा देत आहेत आणि त्यांचा वारसा मराठी साहित्यिक परिदृश्याचा अविभाज्य भाग आहे.

 

Kusumagraj marathi kavita,कुसुमाग्रज प्रसिद्ध कविता

Kusumagraj marathi kavita – महाराष्ट्र राज्यातील थोर मराठी कवी, लेखक, नाटककार, कथाकार आणि समिक्षक ‘कुसुमाग्रज’ उर्फ विष्णू वामन शिरवाडकर तसचं,

तात्या शिरवाडकर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या राज्यात होवून गेलेले एक अग्रगण्य मराठी कवी होते.त्यांनी अनेक कवितांचे लिखाण केलं आहे. कवी कुसुमाग्रज यांनी आपल्या बोलीभाषेत रचलेले कविता संग्रह खूप सुंदर आहेत. चला तर जाणून घेवूया अश्या महान महाराष्ट्रीयन ज्ञानपीठ विजेता कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या बद्दल. यांच्या कविता वाचूया

 

कुसुमाग्रजांची ‘फक्त लढ म्हणा’ लोकप्रिय कविता, Kusumagraj marathi Kavita

 

‘ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी,

कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,

‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.

माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,

मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,

प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे

पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला

‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,

पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा!

कवी – कुसुमाग्रज

 

कुसुमाग्रज कविता

– अवसेची रातपाण्यावर खळबळा लोळतो रुसलेला वातभांबावुनी आभ्रांच्या गर्दित गुदमरल्या तारासुडाने तडतडा फाडतो उभे शीड वारापिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भवतालीप्रचंड भिंगापरी फुटते जळ आदळुनी खालीप्रवासास गल्बते आपुली अशा काळरात्रीवावटळीतिल पिसांप्रमाणे हेलावत जातीपरन्तु अन्धारात चकाके बघा बंदरातस्तम्भावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांतकिरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणीकाळोखावर खोदित बसला तेजाची लेणीउज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोर्‍यातअन् लावा ह्रुदयात सख्यांनो आशेची वात– विशाखा, कुसुमाग्रज

 

कुसुमाग्रज, Kusumagraj Short Poems In Marathi

 

इथे वाटतं प्रत्येकालाआपणच फक्त शहाणेझाल्या जरी हातून चुकातरी करतात बहाणेवाईट नसतं कोणालाहीमनापासून चाहणेमात्र वाईट असतं कोणालाहीपाण्यामध्ये पहाणेजरूरी असतं प्रत्यकानेवकुब ओळखून राहाणेनशिबी येतं नाहीतरप्रवाह पतित वहाणे__कुसुमाग्रज

 

 

पूर्ण झाले चंद्रसूर्य, पुऱ्या झाल्या तारा

पुऱ्या झाल्या नदीनाले, पुरे झाला वारा

मोरासारखा छाती काढून उभा रहा

जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा

शेवाळलेले शब्द आणिक

यमकछंद करतील काय ?

डांबरी सडकेवर श्रावण, इंद्रधनू बांधतील काय ?

उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत,

जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत

नंतर तुला लगिनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय ?

म्हणून म्हणतो जागा हो, जाण्यापूर्वी वेळ

प्रेम नाही अक्षरांच्या, भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं,

प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहण.

प्रेम कर भिल्लासारख, बाणावरती खोचलेल

मतीवरती उगवूनसुद्धा, मेघापर्यंत पोहचलेल

शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस.

उधळून दे तूफान सगळं

काळजामध्ये साचलेलं

प्रेम कर भिल्लासारख

बाणावरती खोचलेल..– कुसुमाग्रज

 

Kusumagraj famous Kavita,

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळाहिच्या संगाने जागल्या,

दर्‍याखोर्‍यांतील शिळाहिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हातज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मातनाही पसरला कर,

 

 

कुसुमाग्रज प्रसिद्ध कविता संग्रह,Kusumagraj famous Kavita

कधी मागायास दानस्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मानहिच्या गगनांत घुमे, आद्य स्वातंत्र्याची द्वाहीहिच्या पुत्रांच्या बाहूंत,

आहे समतेची ग्वाहीमाझ्या मराठी मातीला, नका म्हणू हीन दीनस्वर्गलोकाहून थोर,

मला हिचे महिमानरत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखीचारी वर्णांतुनी फिरे,

सरस्वतीची पालखीरसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वरयेथे अहंता द्रवली, झाले वसुधेचे घरमाझ्या मराठी मातीचा,

नका करू अवमानहिच्या दारिद्य्रात आहे, भविष्याचे वरदानमाझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळाहिच्या संगे जागतील,

मायदेशांतील शिळा– कुसुमाग्रज मराठी कविता

 

Kusumagraj poems on love,

स्वातंत्र्यदेवीची विनवणी

 

पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका

मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे

काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका

अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका

अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका

जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा

एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे

करतील दुसरे, बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा

मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना

कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका

सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने

करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका

प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे

इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका

पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा

भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका

***

कवी – कुसुमाग्रज

दूर मनोर्‍यात

वादळला हा जीवनसागर – अवसेची रात

पाण्यावर खळबळा लोळतो रुसलेला वात

भांबावुनी आभ्रांच्या गर्दित गुदमरल्या तारा

सुडाने तडतडा फाडतो उभे शीड वारा

पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भवताली

प्रचंड भिंगापरी फुटते जळ आदळुनी खाली

प्रवासास गल्बते आपुली अशा काळरात्री

वावटळीतिल पिसांप्रमाणे हेलावत जाती

परन्तु अन्धारात चकाके बघा बंदरात

स्तम्भावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत

किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी

काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी

उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोर्‍यात

अन् लावा ह्रुदयात सख्यांनो आशेची वात

– विशाखा, कुसुमाग्रज

 

Famous Marathi poems kusumagraj

मध्यरात्र उलटल्यावर

शहरातील पाच पुतळे

एका चौथऱ्यावर बसले

आणि टिपं गाळू लागले.

ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो

फ़क्त माळ्यांचा.

शिवाजीराजे म्हणाले ,

मी फ़क्त मराठ्यांचा.

आंबेडकर म्हणाले ,

मी फ़क्त बौद्धांचा.

टिळक उद्गारले ,

मी तर फ़क्त

चित्पावन ब्राम्हणांचा.

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला

आणि ते म्हणाले ,

तरी तुम्ही भाग्यवान.

एकेक जातजमात तरी

तुमच्या पाठीशी आहे.

माझ्या पाठीशी मात्र

फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !

– कुसुमाग्रज

 

kusumagraj marathi poems

कुसुमाग्रज कविता

नको ग नको ग आक्रंदे जमीन

नको ग नको ग आक्रंदे जमीन

पायाशी लोळत विनवी नमून

धावशी मजेत वेगात वरून

आणिक खाली मी चालले चुरून

छ्यातित पाडसी कितिक खिंडारे

कितिक ढाळीशी वरून निखारे

नको ग नको ग आक्रंदे जमीन

जाळीत जाऊ तू बेहोश होउन

ढगात धूराचा फवारा सोडून

गर्जत गाड़ी ती बोलली माजून

दुर्बल अशीच खुशाल ओरड

जगात कशाला जगावे भेकड

पोलादी टाचा ह्या छय्यातित रोंउन

अशीच चेंदत धावेन धावेन

चलाले चक्रानो फिरत गरारा

गर्जत पुकारा अपुला दरारा

शीळ अन कर्कश गर्वात फुंकून

पोटात जळते इंधन घालून

शिरली घाटात अफाट वेगात

मैलाचे अंतर घोटात गीळीत

उद्दाम गाडीचे ऐकून वचन

क्रोधात इकडे थरारे जमीन

दुर्बल, भेकड, त्वेषाने पुकारी,

घुमले पहाड़, घुमल्या कपारी

हवेत पेटला सूडाचा धुमारा

कोसले दरीत पुलाचा डोलारा

उठला क्षणात भयान आक्रोश

हादरे जंगल, कापले आकाश

उलटी पालटी होउन गाड़ी ती

हजार शकले पडली खाली ती

कुसुमाग्रज

✨✨✨

 

 

कुसुमाग्रज कविता | Kusumagraj marathi kavita

 

स्वप्नाची समाप्ति

स्नेहहीन ज्योतीपरी

मंद होई शुक्रतारा

काळ्या मेघखंडास त्या

किनारती निळ्या धारा.

स्वप्नासम एक एक

तारा विरे आकाशांत

खिरे रात्र कणकण

प्रकाशाच्या सागरांत.

काढ सखे, गळ्यांतील

तुझे चांदण्याचे हात

क्षितिजाच्या पलिकडे

उभे दिवसाचे दूत.

रातपाखरांचा आर्त

नाद नच कानीं पडे

संपवुनी भावगीत

झोंपलेले रातकिडे.

पहांटचे गार वारे

चोरट्यानें जगावर

येती, पाय वाजतात

वाळलेल्या पानांवर.

शांति आणि विषण्णता

दाटलेली दिशांतुन

गजबज गर्जवील

जग घटकेनें दोन !

जमूं लागलेले दंव

गवताच्या पातीवर

भासतें भू तारकांच्या

आसवांनीं ओलसर.

काढ सखे, गळ्यांतील

तुझे चांद्ण्यांचे हात

क्षितिजाच्या पलिकडे

उभे दिवसाचे दूत

प्राजक्ताच्या पावलाशीं

पडे दूर पुष्प-रास

वार्‍यावर वाहती हे

त्याचे दाटलेले श्वास.

ध्येय, प्रेम, आशा यांची

होतसे का कधीं पूर्ती

वेड्यापरी पूजतों या

आम्ही भंगणार्‍या मूर्ती

खळ्यामध्यें बांधलेले

बैल होवोनिया जागे

गळ्यांतील घुंगरांचा

नाद कानीं येऊं लागे.

आकृतींना दूरच्या त्या

येऊं लागे रूप-रङ्ग

हालचाल कुजबूज

होऊं लागे जागोजाग.

काढ सखे, गळ्यांतील

तुझे चांद्ण्याचे हात

क्षितिजाच्या पलिकडे

उभे दिवसाचे दूत.

होते म्हणूं स्वप्न एक

एक रात्र पाहिलेलें

होतें म्हणूं वेड एक

एक रात्र राहिलेले.

प्रकाशाच्या पावलांची

चाहूल ये कानावर

ध्वज त्याचे कनकाचे

लागतील गडावर.

ओततील आग जगी

दूत त्याचे लक्षावधी

उजेडांत दिसूं वेडे

आणि ठरूं अपराधी.

 

कवी – कुसुमाग्रज

 

कुसुमाग्रज कविता, विशाखा – कुसुमाग्रज

kusumagraj kavita in marathi

लिलाव

उभा दारी कर लावुनी कपाळा

दीन शेतकरी दावुनी उमाळा,

दूत दाराशी पुकारी लिलाव,

शब्द कसले ते-घणाचेच घाव !

पोसलेले प्राशून रक्त दाणे

उडुनि जाती क्षणी पाखरांप्रमाणे

निघत मागुनि वाजले आणि थाळि,

गाडग्यांची ये अखेरीस पाळी !

वस्तुवस्तूवर घालुनिया धाड

करित घटकेतच झोपडे उजाड

स्तब्ध बाजूला बसे घरधनीण

लाल डोळ्यातिल आटले उधाण

भुके अर्भक अन् कवळुनी उरास

पदर टाकुनि त्या घेइ पाजण्यास

ऊर उघडे ते तिचे न्याहळोनी

थोर थैलीतिल वाजवीत नाणी

‘आणि ही रे !’ पुसतसे सावकार,

उडे हास्याचा चहुकडे विखार

कवी – कुसुमाग्रज

 

कुसुमाग्रज कविता, विशाखा – कुसुमाग्रज

 

हिमलाट

हिमलाट पहांटे पहा जगावर आली !

मुखिं पिळून मद्यास्तव द्राक्षांचे घोस

पाडीत मळे मोत्यांचे चरणीं ओस

उद्दाम धावते करित दुभङ्ग धरेस

करकरां पांखरें रगडी दाताखालीं

हिमलाट पहांटे पहा जगावर आली !

श्रीमन्त महालीं तिथें हिला न थारा

मखमाली दुलया देती मधुर उबारा

डोकावुन पळते कापत हीच थरारा

हो काय दरारा कनकाचा भयशाली

 

हिमलाट पहांटे पहा जगावर आली !

पाहून परन्तू कुठें कुडाचीं खोपीं

कंगाल कांबळीं टाकुन गेले झोंपी

शेंकडों कवाडे ! वाट जावया सोपी

कडकडून पडते तेथें लांब भुकेली

 

हिमलाट पहांटे पहा जगावर आली !

ज्योतींतुनि धावत या तेजःकण सारे

या यज्ञांतिल अन्‌सरणांतील निखारे

रे ढाळ नभा, तव ते ज्वालामय तारे

पेटवुं द्या वणवा कणाकणांत मशाली

हिमलाट पहांटे पहा जगावर आली !

 

कवी – कुसुमाग्रज

 

✨✨✨

 

कुसुमाग्रज कविता | Kusumagraj marathi kavita

केव्हातरी मिटण्यासाठीच

केव्हातरी मिटण्यासाठीच

काळजामधला श्वास असतो

वाट केव्हा वैरीण झाली

तरी झाडे प्रेमळ होती

लाल जांभळे भेटून गेली

साथीत उरली निळी नाती

काळोखाच्या गुहेतदेखील

धडपडणारे किरण होते

पेटविलेल्या दीपालींना

वादळवारयात मरण होते

असणे आता असत असत

नसण्यापाशी अडले आहे

जिव्हाळ्याच्या चिता पेटवीत

बरेच चालणे घडले आहे

माथ्यावरचा आभाळबाबा

सवाल आता पुसत नाही

पृथ्वी झाली पावलापुरती

अल्याड पल्याड दिसत नाही

– कुसुमाग्रज

 

गाभारा | Kusumagraj marathi kavita

दर्शनाला आलात? या..

पण या देवालयात, सध्या देव नाही

गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.

सोन्याच्या सम्या आहेत, हिर्‍यांची झालर आहे.

त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.

वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या

पाहीलात ना तो रिकामा गाभारा?

नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे

काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,

दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा

दोन तास वामकुक्षी घ्यायचा

सार काही ठीक चालले होते.

रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग

पडत होते पायाशी..

दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते

मंत्र जागर गाजत होते

रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.

बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते

सारे काही घडत होते.. हवे तसे

पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव

उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला

कोणी एक भणंग महारोगी

तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”

आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय

गाभारा रिकामा

पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..

परत? कदाचित येइलही तो

पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर त्याला पुन्हा..

प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,

आमच्या ट्रस्टींना,

पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्‍या मुर्तीसाठी

पण तुर्त गाभार्‍याचे दर्शन घ्या.

तसे म्हटले तर, गाभार्‍याचे महत्व अंतिम असत,

कारण गाभारा सलामत तर देव पचास.

कुसुमाग्रज

 

क्रांतीचा जयजयकार – कुसुमाग्रज | Kusumagraj marathi kavita

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार

अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार!

खळखळू द्या या अदय शृंखला हातापायांत

पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?

सर्पांनो उद्दाम आवळा, करकचूनिया पाश

पिचेल मनगट परि उरातील अभंग आवेश

तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार

कधीही तारांचा संभार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

 

क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान

कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान

संहारक काली, तुज देती बळीचे आव्हान

बलशाली मरणाहून आहे अमुचा अभिमान

मृत्यूंजय आम्ही! आम्हाला कसले कारागार?

अहो हे कसले कारागार?

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

 

पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती

होऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती

कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे

बांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे

एकच ताळा समोर आणिक पायतळी अंगार

होता पायतळी अंगार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

 

श्वासांनो जा वायूसंगे ओलांडुनी भिंत

अन् आईला कळवा अमुच्या हृदयातील खंत

सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात

बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात

तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परि अनिवार

तयांना वेड परि अनिवार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

 

नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात

तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात

चरणांचे तव पूजन केले म्हणुनी गुन्हेगार

देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर

देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार

आई वेड्यांना आधार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

 

कशास आई, भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल

रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल

सरणावरती आज अमुची पेटता प्रेते

उठतील त्या ज्वालांतून क्रांतीचे नेते

लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार

आई, खळखळा तुटणार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

 

आता कर ॐकारा तांडव गिळावया घास

नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास

रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर

पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर

शरीरांचा कर या सुखेनैव या सुखेनैव संहार

मरणा, सुखेनैव संहार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा क्रांतीचा जयजयकार

कवी – कुसुमाग्रज

 

 

 

 

Marathi kavita kusumagraj …

 

तो क्षण निघून गेला अन मी पाहतच राहीलो…….

 

एकदा एका डोळे मध्यल्या अश्रुने दुस-याला विचारले……

‘ए का रे आपण असे

ना रंग, ना रूप,

नेहमीच मात्र चिडीचुप,

आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,

दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा अहेर,

 

कोणीच कसे थांबवत नाही आपल्याला,

किनारा ही साधा नाही या पापण्याला…………

दुस-यालाही जरा मग प्रश्न पडला,

खुप विचार करून मग तो बोलला,

 

रंग-रूप नसला तरीही,

चिडीचुप असलो जरीही,

आधार ठेवतो भावनांचा,

आदर राखतो वचनांचा,

 

सान्त्वनांचे बोल आपणच ,

अंतरीही खोल आपणच ,

सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,

दु:खाच्या प्रसंगी आपलेच मात्र महत्व,

 

आपल्याला कोणी नाही थांबवु शकत,

बंधनात नाही कोणी बांधु शकत,

उद्रेक आपल्या मनातील वेदनांचा,

नाजुक धागा वचनातील बंधनांचा,

 

भावबंध ह्र्दयातील स्पंदनांचा,

स्वरबद्ध झंकार तनातील स्पंदनांचा ,

म्हणुनच,

आपले बाहेर पड़णे भाग आहे,

आपल्यामुळेच आज हे जग उभे आहे.

 

अशीच आपली ही कहाणी………

ऐकून अश्रुंची ही वाणी

अश्रुच्याच डोळ्यांत हळुच आले पाणी……..

__कुसुमाग्रज

 

जालियनवाला बाग – कुसुमाग्रज | Kusumagraj marathi kavita

रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे

विरले ना ध्वनि तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे

मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष-

“प्रेम, शांती अन् क्षमा यामधे वसतो परमेश !”

आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात

निःशस्त्रांच्या रक्तामांसामधे नाहतात

मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात

जगजेत्यांच्या प्रराक्रमाची स्फूर्तिप्रद रीत !

पाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास

नयन झाकले असशील देवा, तूं अपुले खास;

असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात

एक जखम अन् नवीन येशू, तुझ्या काळजांत !

कवी – कुसुमाग्रज

 

सागर – कुसुमाग्रज

आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे

निळ्याजांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेसफुलांचे सफ़ेद शिंपित वाटेवरती सडे

हजार लाटा नाचत येती गात किनार्‍याकडे

 

मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती

दंगल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती

 

संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते

देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

 

तुफान केव्हा भांडत येते सागरही गर्जतो

त्या वेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो

 

खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी

ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी

 

प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी

नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी

 

दर्यावरची रंगीत मखमल उचलुन घेते कुणी

कृष्ण सावल्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी

 

दूर टेकडीवरी पेटती निळे तांबडे दिवे

सांगतात ते मजला आता घरी जायला हवे

 

कवी – कुसुमाग्रज

 

poems kusumagraj.

अहि नकुल | Kusumagraj marathi kavita

ओतीत विखारी वातावरणी आग

हा वळसे घालित आला मंथर नाग,

मधुनीच उभारी फणा, करी फुत्कार

ये ज्वालामुखीला काय अचानक जाग !

कधी लवचिक पाते खड्‌गाचें लवलवते,

कधी वज्र धरेवर गगनातुनी कडकडते,

कधी गर्भरेशमी पोत मधे जरतार,

प्रमदेचे मादक वस्त्र जणूं सळसळते.

 

मार्गावर याच्या लवत तृणाची पाती

पर्णावर सुमने मोडुनी माना पडती

थरथरती झुडुपे हादरती नववेली

जग गुलाम सारे या सम्राटापुढती.

 

चालला पुढे तो-काय ऐट ! आनंद !

अग्नीचा ओघळ ओहळतो जणुं मंद,

टाकली यमाने कट्यार वा कनकाची

चालली बळींचा वेध घेत ही धुंद.

 

वा ताण्डव करता सोम प्राशुनी काली

रक्तांत नाहली, शिरमुंडावळ भाली,

थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या,

हे कंकण निखळुनि पडले भूवर खाली.

 

चालला पुढे तो लचकत मुरडत मान,

अवतरे मूर्तिमान् मल्हारांतिल तान

चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य

चालला मृत्युचा मानकरीच महान !

 

हा थांब-कुणाची जाळीमधे चाहूल

अंगावर-कणापरी नयन कुणाचे लाल,

आरक्त ओठ ते ध्वजा जणू रक्ताच्या,

रे नकूल आला ! आला देख, नकूल !

 

थबकलाच जागीं सर्प घालुनी वळसा,

रिपु समोर येता सोडुनी अन् आडोसा,

भूमीस मारुनी मागे तीव्र तडाका,

घे फणा उभारुन मरणाचा कानोसा.

 

पडलीच उडी ! कि तडितेचा आघात

उल्केपरि तळपत कण्यात घुसले दात,

विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प

फुंफाट करी अन् पिशापरी त्वेषांत !

 

रण काय भयानक-लोळे आग जळांत

आदळती, वळती, आवळती क्रोधांत,

जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व

आषाढघनाशी झुंजे वादळवात !

 

क्षणि धुळीत गेली वहात ती विषधार

शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर

विच्छिन्न तनूंतुनि उपसुनी काढुनी दात

वार्‍यापरी गेला नकुल वनांतुनी दूर।

 

संग्राम सरे, रक्ताचे ओघळ जाती,

आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती,

पिंजून कापसापरी पडे तो नाग,

ते खंड गिळाया जमले कीटक भोती !

कवी – कुसुमाग्रज

 

नदी – कुसुमाग्रज | Kusumagraj marathi kavita

 

नदीबाई माय माझी डोंगरात घर

लेकरांच्या मायेपोटी येते भूमीवर

नदीबाई आई माझी निळे निळे पाणी

मंद लहरीत गाते ममतेची गाणी

 

नदीमाय जळ सा-‍या तान्हेल्यांना देई

कोणी असो कसा असो भेदभाव नाही

 

शेतमळे मायेमुळे येती बहरास

थाळीमध्ये माझ्या भाजी-भाकरीचा घास

 

श्रावणात आषाढात येतो तिला पूर

पुढच्यांच्या भल्यासाठी जाई दूर दूर

 

माय सांगे, थांबू नका पुढे पुढे चला

थांबत्याला पराजय चालत्याला जय

 

कवी – कुसुमाग्रज

 

 

समिधाच सख्या या –कुसुमाग्रज | Kusumagraj marathi kavita

 

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता

वाहते जिच्यातुनि त्याची जीवन-सरिता,

खळखळे, अडथळे, सुके, कधी फेसाळे

परि अखंड शोधे वाट समुद्राकरिता ||

खडकाळ प्रान्त तो ही जेथून निघाली

पथ शोधित आली रानातून अकेली,

नच रम्य राउळे, कलापूर्ण वा घाट

तीरावर तुरळक परि अंकुरती वेली ||

 

नव पर्णाच्या या विरल माण्डवाखाली,

होईल सावली कुणा, कुणास कहाली,

तोषेल कुणी, शापील कुणी दुर्वास,

“या जळोत समिधा-भव्य हवी वृक्षाली !”

 

समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,

कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा?

जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा,

तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा ||

 

कवी – कुसुमाग्रज

 

कुसुमाग्रज कविता कणा,

कणा – कुसुमाग्रज

ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी,

कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,

‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.

 

माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,

मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.

 

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,

प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

 

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे

पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.

 

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला

‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.

 

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,

पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा!

 

कवी – कुसुमाग्रज

 

कुसुमाग्रज कविता

अनामवीरा – कुसुमाग्रज

अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनांत

स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात

धगधगता समराच्या ज्वाला या देशासाठी

जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी

 

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा

मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा

 

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव

रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव

 

जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान

सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान

 

काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा

प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा

 

कवी – कुसुमाग्रज

 

 

अनामवीरा – कुसुमाग्रज कविता | Kusumagraj marathi kavita

 

अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनांत
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात

धगधगता समराच्या ज्वाला या देशासाठी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव

जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान

काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वी             

           कवी – कुसुमाग्रज

 

तर मित्रांनो कशी वाटली आमची पोस्ट नक्की सांगा , सुप्रसिद्ध कवी कुसमाग्रज Kusumagraj marathi kavita यांचा काही सुप्रसिद्ध कविता तुम्हाला नक्की आवडल्या असणार

2 thoughts on “Kusumagraj marathi kavita, कुसुमाग्रज यांच्या काही प्रसिद्ध कविता,”

Leave a Comment