Is Your Smartphone Frequently Overheating In Winter Then Be Careful Your Phone Can Be Hacked


Mobile Hacking: एकीकडे इंटरनेटमुळे (Internet) आपले जीवन पूर्वीपेक्षा सहज आणि सोप्पे झाले आहे. तर दुसरीकडे त्यामुळे लोकांच्या अनेक अडचणीही वाढल्या आहेत. आज आपला स्मार्टफोन ही आपली सर्वात मोठी संपत्ती आणि गरज आहे. स्मार्टफोनमध्येच (Smartphone) घरातील महत्वाचे कागदपत्रे, बँकेचे तपशील, व्यवसायाची माहिती, अशा सर्व महत्त्वाच्या गोष्टी सेव्ह करून ठेवतो. तुम्ही इंटरनेटद्वारे सायबर फसवणूक प्रकरणांबद्दल वाचलं आणि ऐकलं असेल. या प्रकरणांतून समोर येणारी मुख्य गोष्ट म्हणजे लोकांचे दुर्लक्ष. जर एखाद्या व्यक्तीने वेळीच सावधगिरी बाळगली किंवा निष्काळजीपणा केला नाही तर तो मोठ्या फसवणुकीपासून स्वतःला वाचवू शकतो. सायबर फसवणुकीचा (Cyber Fraud Cases) प्रश्न येतो तेव्हा लोकांना असे वाटते की हॅकर्स (Hack) कॉल (Call), ई-मेल (Email), ओटीपीद्वारे (OTP) लोकांच्या पैशांची फसवणूक करतात. मात्र आजकाल कॉल, एसएमएसशिवाय ही तुमचा मोबाईल हॅक करून बँक खाते रिकामी होऊ शकते.  

तुमचा स्मार्टफोन (Smartphone) न वापरताही खूप गरम होतो आणि त्याची बॅटरी लवकर संपते का? जर असे असेल, तर ते ताबडतोब त्याला सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जा, अन्यथा तुम्हाला याचा मोठा फटका बसू शकतो. आजकाल हॅकर्स तुमच्या मोबाईल फोनमध्ये असे अनेक अदृश्य सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतात जे तुम्हाला समोरून दिसत नाहीत, पण बॅकग्राऊंडमध्ये सुरू राहून तुमची वैयक्तिक माहिती चोरत असतात. यामुळे तुमचा मोबाईल फोन वारंवार गरम होतो आणि हँग होऊ लागतो. अनेकवेळा लोक मोबाईल गरम होणे हे सामान्य गोष्ट समजून दुर्लक्ष करतात, पण नंतर ती मोठी चूक ठरते.

How To Know If Phone Is Hacked Or Not? फोन हॅक झाला आहे की नाही हे कसे कळेल? 

मोबाईल फोन हॅक (Mobile Hacking) झाला आहे की नाही हे जाणून घेण्याचे खूप सोपे मार्ग आहेत. जसे रोगाची लक्षणे असतात, त्याचप्रमाणे मोबाईल हॅकिंगची (Mobile Hacking) लक्षणेही वेगवेगळी असतात. जर तुमचा स्मार्टफोन जास्त गरम होत असेल किंवा त्याची बॅटरी लवकर संपत असेल तर समजा मोबाईल हॅक झाला आहे. जर तुम्हाला वारंवार अकाउंट लॉग-इन मेसेज येत असतील किंवा अनोळखी कॉल्स आणि एसएमएस किंवा पॉपअप जाहिराती दिसत असतील, तर तुमचा मोबाइल फोन हॅक (Mobile Hacking) झाला असे समजा.

Do not click on any suspicious website or message: कोणत्याही संशयास्पद वेबसाइट किंवा संदेशावर क्लिक करू नका

बर्‍याच वेळा असे होते की, जेव्हा तुम्ही एखाद्या वेबसाइटवर जाता तेव्हा हॅकर्स (Mobile Hacking) वेबसाइटवर दिसणार्‍या लिंकवर क्लिक करताच तुमच्या मोबाइल फोनवर प्रवेश करतात. यानंतर तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतात. विशेषत: सुरक्षित नसलेल्या वेबसाइट्समध्ये अशा घटना अधिक प्रमाणात घडतात. त्यावेळी तुम्हाला अजिबात वाटणार नाही की, तुम्ही काही चुकीचे केले आहे. पण हॅकर्सनी त्यांचे काम आधीच केलेलं असतं. मालवेअर किंवा फसवणूक अॅपमुळे, तुमचा स्मार्टफोन गरम होऊ लागतो आणि आवश्यकतेपेक्षा जास्त बॅटरी वापरतो. 

News Reels

दरम्यान, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा मोबाइल फोन जास्त गरम होत आहे किंवा त्याची बॅटरी लवकर संपत आहे. तर लगेच स्मार्टफोनचा व्यवस्थित तपासा आणि एकदा तो फॅक्टरीमध्ये रीसेट करा. लक्षात ठेवा, तुम्हाला  घाबरण्याची गरज नाही पण सतर्क राहण्याची गरज आहे. तुमचा विश्वास असल्याशिवाय कोणतीही लिंक, मेसेज किंवा मेल उघडू नका.Source link

Leave a Comment