Infinix Smart 7 Smartphone Soon To Be Launch In India Know Price And Specifications Marathi News


Infinix Smart 7 Smartphone : स्मार्टफोन ब्रॅंड कंपनी Infinix भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Infinix Smart 7 असं या स्मार्टफोनचं नाव असून हा मोठा डिस्प्ले आणि बॅटरीसह सादर केला जाणार आहे. नुकतीच या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगची तारीख समोर आली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटनुसार पहा स्मार्टफोन 22 फेब्रुवारी रोजी लॉन्च होणार आहे. या स्मार्टफोनची स्पर्धा Poco C50,Moto E13, Redmi A1, Galaxy F04/M04 बरोबर होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये आणखी काय वैशिष्ट्य आहेत या संदर्भात सविस्तर माहिती वाचा. 

Infinix Smart 7 ची किंमत किती? 

हा स्मार्टफोन 22 फेब्रुवारीला लॉन्च होणार आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर नवीन स्मार्टफोनची किंमत 7,500 रुपये असण्याची शक्यता आहे. यामध्ये तुम्हाला दोन कलर ऑप्शन्स मिळू शकतात. 

Infinix Smart 7 या स्मार्टफोनशी स्पर्धा करणार

Infinix Smart 7 स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर Poco C50, Moto E13, Redmi A1, Galaxy F04/M04 आणि याच किंमतीच्या रेंजमधील इतर स्मार्टफोनशी स्पर्धा असणार आहे. 

Infinix Smart 7 चे वैशिष्ट्य कोणते असेल

डिस्प्ले : HD+ रिझोल्यूशनसह 6.6-इंच वॉटर-ड्रॉप नॉच डिस्प्ले, मानक रिफ्रेश दर आणि चमकदार पॅनेल 

प्रोसेसर : MediaTek Helio A22 चिपसेट 

RAM आणि स्टोरेज : 4GB RAM आणि 64GB अंतर्गत स्टोरेज, 3GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट

कॅमेरा : ड्युअल कॅमेरा सिस्टम 

बॅटरी : मोठी 6,000mAh बॅटरी 

Infinix Smart 7 हा स्मार्टफोन आधीच जागतिक स्तरावर लॉन्च झाला आहे. स्मार्टफोनच्या प्रकारानुसार, नवीन स्मार्टफोनला 6.6-इंचाचा HD Plus IPS LCD डिस्प्ले मिळेल, ज्याच्या डिस्प्लेमध्ये 400 nits ब्राइटनेस आणि (1612 x 720 pixels) रिझोल्यूशन असेल. हा स्मार्टफोन भारतात Android 12 आधारित XOS 12 सह लॉन्च केला जाईल. हा फोन 4 जीबी रॅम आणि 3 जीबी व्हर्च्युअल रॅमसह सादर केला जाईल. मात्र, आतापर्यंत कंपनीने स्मार्टफोनच्या प्रोसेसरचा खुलासा केलेला नाही.

स्मार्टफोनमध्ये सुरक्षेसाठी रियर-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेशियल अनलॉक सपोर्ट मिळू शकते. ज्यामध्ये 3.5mm हेडफोन जॅक आणि USB टाईप-सी पोर्ट मिळेल. स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा असण्याची शक्यता आहे. कॅमेऱ्याच्या संदर्भात बोलायचे झाल्यास यामध्ये 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा असेल असं बोललं जात आहे. पण या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

महत्त्वाच्या बातम्या : 

ChatGPT vs Google Bard: चॅट जीपीटी आणि गुगलच्या नवीन एआय टूल ‘बार्ड’मध्ये काय फरक आहे? जाणून घ्याSource link

Leave a Comment