Jack Dorsey On Twitter Layoffs : ट्विटरची मालकी घेतल्यानंतर जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क ( Elon Musk ) यांच्याकडून मोठे बदल करण्यात येत आहेत. ट्विटरने ( Twitter ) नुकतीच मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून कमी ( Twitter Layoffs ) केलं आहे. यावर ट्विटरचे संस्थापक ( Twitter Founder ) आणि माजी सीईओ जॅक डोर्सी ( Jack Dorsey ) यांनी ट्विटरमधील कर्मचारी कपातीवर प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी ट्विटर कंपनीने कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे.
‘सध्याच्या परिस्थितीसाठी मी जबाबदार’
ट्विटर कंपनीने केलेल्या कर्मचारी कपातीवर जॅक डॉर्सी यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, ‘सध्याच्या परिस्थितीसाठी मी जबाबदार आहे. आणि मला माहित आहे की बरेच लोक माझ्यावर ‘राग’ आहेत.’ कंपनीमध्ये खूप वेगाने बदल केल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
Folks at Twitter past and present are strong and resilient. They will always find a way no matter how difficult the moment. I realize many are angry with me. I own the responsibility for why everyone is in this situation: I grew the company size too quickly. I apologize for that.
— jack (@jack) November 5, 2022
‘यासाठी मला माफ करा’
जॅक डोर्सी यांनी ट्विटरवर ट्विट करत लिहिलं आहे की, ‘ट्विटरचा भूतकाळ आणि वर्तमान मजबूत आणि परिवर्तनीय आहे. परिस्थिती कितीही कठीण असला तरी त्यांना नेहमीच मार्ग सापडतो. मला जाणवलंय की, अनेक लोक माझ्यावर नाराज आहेत. प्रत्येकजण सध्या ज्या स्थितीत आहे, याला मी जबाबदार आहे, मी कंपनीचं स्वरूप खूप वेगाने वाढवलं होतं. मी त्याबद्दल माफी मागतो.’