How To Update Your Iphone For 5g Network Use 5g Network In Your Iphone


iPhone 5G Update : आयफोन ( iPhone ) युजर्ससाठी चांगली बातमी आहे. ॲपल ( Apple ) कंपनीने ( Apple Company ) युजर्ससाठी 5 सर्व्हिस ( 5G Service ) लाँच केली आहे. पण सध्या ही सेवा काही ठराविक मॉडेल्ससाठी मर्यादित आहे. ॲपल कंपनीने काही आयफोन मॉडेल्ससाठी नवीन 5G अपडेट ( 5G Update ) जारी केलं आहे. हे अपडेट सध्या आयफोन 14, आयफोन 13, आयफोन 12 आणि आयफोन SE या मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या या नव्या अपडेटमुळे या एअरटेल ( Airtel 5G ) आणि जिओ ( Jio 5G ) युजर्सना त्यांच्या आयफोनमध्ये 5G नेटवर्क ( iPhone 5G Service ) वापरता येणार आहे.

‘या’ iPhones मध्ये चालेल 5G नेटवर्क

भारतातील टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आणि एअरटेलने काही आठवड्यांपूर्वीच निवडक शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. आता Apple कंपनीने देखील आपल्या युजर्सना 5G सेवेचा लाभ घेता यावा यासाठी नवीन अपडेट 16.2 जारी केलं आहे. या नवीन अपडेटमुळे यूजर्स आता त्यांच्या जुन्या आयफोनमध्येच 5G सेवा वापरू शकतील. पण, कंपनीने काही निवडक iPhones साठी अपडेट जारी केलं आहे, सर्व आयफोनसाठी नाही. यामध्ये iPhone 14, iPhone 13, iPhone 12 आणि iPhone SE या आयफोनचा समावेश आहे. भारतातील आयफोन बीटा युजर्सनाही आता 5G सेवेचाही लाभ घेता येईल. पण काही आयफोन बीटा युजर्सची 5G सेवा सुरु होण्यासाठी वेळ लागू शकतो, कारण कंपनी टप्प्याटप्प्याने अपडेट आणत आहे.

iPhone 14, iPhone 13, iPhone 12 आणि iPhone SE  मॉडेल आणि iOS 16 बीटा वापरणाऱ्या आयफोन युजर्सना मोबाईलमधील सेटिंग्समध्ये बदल करुन 5G सेवा वापरता येईल. तुमच्या आयफोनमधील सेटिंग्ज कशी बदलायची ते जाणून घ्या.

Reels

आयफोनमध्ये 5G कसं सुरु कराल?

  • तुमच्या iPhone च्या सेटिंग्जमध्ये जाऊन अपडेट तपासा.
  • तुमच्या फोनमध्ये अपडेट असल्यास, ते डाउनलोड करा.
  • यानंतर तुमच्या फोनवर beta.apple.com/profile वर जा.
  • एकदा डाउनलोड केल्यानंतर इंस्टाल पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर, सेटिंगमध्ये जाऊन, जनरल > व्हीपीएन आणि नंतर डिव्हाइस मॅनेजमेंट पर्यायावर जाऊन iOS 16 बीटा वर क्लिक करा.

अशा प्रकारे बीटा वर्जन तुमच्या आयफोनच्या सेटिंग अॅपमध्ये उपलब्ध होईल. तुमच्या शहरात 5G सेवा सुरु झाली असेल तर तुम्ही तुमच्या iPhone वर 5G नेटवर्कशी कनेक्ट करू शकता.

टीप : तुमच्या iPhone मध्ये 5G साठी अपडेट करण्यापूर्वी डेटाचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी तुमच्या मोबाइल डेटाचा बॅकअप घ्या.Source link

Leave a Comment