How Mask Air Purifier Work These Are The Best Mask With Air Purifier Marathi News


Electric Mask : देशात आणि जगात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. यामुळेच प्रदूषणाचा धोका देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा परिणाम असा झाला की जगातील जवळपास सर्वच मोठी शहरे भयंकर प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत आणि हे प्रमाण वाढून आता छोट्या शहरांपर्यंतही पोहोचत आहे. तर, टेक्नॉलॉजीदेखील यातून सामोरे जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. काही कंपन्यांचे एअर प्युरिफायर मास्क बाजारात उपलब्ध आहेत. जे अशा परिस्थितीत थोडा दिलासा देण्याचे काम करतात. या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच मास्कची किंमत आणि त्याच्या फिचर्सबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. 

किंमत आणि तपशील (Price and Specifications) :

या प्रोडक्टची सुरुवातीची किंमत 20,990 रुपयांपासून सुरू होते. एअर प्युरिफायर देखील जवळजवळ इतकेच येते. या प्रोडक्टमध्ये असलेले HEPA फिल्टर धुळीचे कण तसेच हवेतील हानिकारक कणांना फिल्टर करते. त्याची रचना अशी आहे की ती दीर्घकाळ वापरता येते.

LG चा पुरीकेअर मास्क दोन कलरच्या ऑप्शनमध्ये (ओशन ब्लॅक आणि क्रीमी व्हाईट) उपलब्ध आहे. तसेच, या मास्कला इनबिल्ट बॅटरीदेखील देण्यात आली आहे. एअर प्युरिफायर मास्कची बॅटरी 8 तासांचा बॅकअप देते. तसेच, या वेअरेबल एअर प्युरिफायरमध्ये दोन H13 HEPA फिल्टर्स आणि थ्री लेव्हल स्पीडसह ड्युअल फॅनचा वापर करण्यात आला आहे.

Reels

असे कार्य करते 

याशिवाय या मास्कमध्ये असलेला रेस्पिरेटरी सेन्सर फॅनला तुमच्या श्वासोच्छवासाच्या गतीनुसार कार्य करतो. या मास्कचे फिल्टर खराब झाल्यास तसा मेसेज तुमच्या मोबाईलवर देखील ही सूचना देतो. मोबाईलवर बोलण्यासाठी त्यात इनबिल्ट माईक आहे.

याशिवाय, बाजारात आणखी एक सहन करण्यायोग्य एअर प्युरिफायर AIR Tammer आहे. यात HEPA फिल्टर देखील आहे आणि त्याची किंमत 9,999 रुपये आहे. हे ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून देखील तुम्ही हा मास्क खरेदी करू शकता. 50 ग्रॅम वजनाचे हे प्रोडक्ट USB पोर्टवरून चार्ज करता येते. ते चालू आणि बंद करण्यासाठी एक बटण देखील आहे. या दोन्ही प्रोडक्टचा वापर करून तुम्ही वायू प्रदूषणापासून, धुळीच्या प्रदूषणापासून नक्कीच आराम मिळवू शकता.  

महत्वाच्या बातम्या : 

Twitter Blue Tick : तुमची ब्लू टिक धोक्यात! ब्लूक टिक ट्विटर अकाऊंटची पडताळणी होणार; मस्क यांचं ट्विट चर्चेतSource link

Leave a Comment