How Different Is Swadeshi BharOS From Android OS Know Complete Information


BharOS vs Android: जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन बाजारपेठांपैकी एक Google च्या Android ऑपरेटिंग सिस्टमला आता भारताकडून टक्कर मिळणार आहे. Android Os वरील अवलंबित्व कमी करण्याच्या योजनांवर भारत काम करत आहे. देशाचे परदेशी तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करणे आणि देशांतर्गत उत्पादकांसाठी अधिक वाव मिळावा, या उद्दिष्टाने पहिले मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. BharOS मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम हा या दिशेने केलेला नवीन प्रयत्न आहे.

BharOS vs Android: BharOS काय आहे? 

BharOS ही देशातील स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम आहे. जी आयआयटी मद्रास इनक्यूबेटेड फर्मने विकसित केली आहे. नवीन मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीमचे उद्दिष्ट देशातील 100 कोटी मोबाईल युजर्सपर्यंत पोहोचण्याचे सेट करून अँड्रॉइड स्पेसमध्ये गुगलच्या वर्चस्वाचा सामना करायचा आहे.

BharOS च्या लॉन्चिंग प्रसंगी बोलताना आयआयटी मद्रासचे संचालक प्रा. व्ही. कामकोटी म्हणाले की, ”BharOS मध्ये युजर्सला अॅप्स निवडण्यासाठी आणि वापरण्यासाठी अधिक स्वातंत्र्य, नियंत्रण आणि लवचिकता प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.” मात्र गुगल अँड्रॉइड ही मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी ओपन-सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. जी गुगलने मोबाईल डिव्‍हाइसेस आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्‍हाइसेससाठी विकसित केली आहे. BharOS च्या निर्मात्यांनी असा दावा केला आहे की, ही ऑपरेटिंग सिस्टीम युजर्सला अधिक सुरक्षा आणि प्रायव्हसी प्रदान करते. 

BharOS vs Android: BharOS मध्ये काय आहे खास 

1. BharOS ही एक मोबाईलऑपरेटिंग सिस्टीम आहे. ज्याचा उद्देश युजर्सला अधिक सुरक्षा आणि प्रायव्हसी देणं आहे. 
2. BharOS मध्ये कोणतेही ब्लॉटवेअर किंवा डीफॉल्ट अॅप्स समाविष्ट नाहीत, ज्यामुळे युजर्सला अधिक स्टोरेज मिळते.
3. यामध्ये कोणत्याही डिफॉल्ट अॅप्सशिवाय, युसरला असे कोणतेही अॅप वापरण्यास भाग पाडले जात नाही, ज्यावर ते विश्वास ठेवू शकत नाहीत.
4.  BharOS Android सारखी नेटिव्ह ओव्हर द एअर (NOTA) अपडेट्स प्रदान करते. याचा अर्थ सॉफ्टवेअर अपडेटआपोआप डाउनलोड होतील आणि डिव्हाइसवर इंस्टॉल होतील.

news reels New Reels

BharOS vs Android: Android OS पेक्षा किती वेगळा आहे BharOS?

BharOS तांत्रिकदृष्ट्या Android सारखेच आहे, कारण या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टम लिनक्स कर्नलवर आधारित आहेत. BharOS आणि Google च्या Android मधील मुख्य फरक म्हणजे BharOS मध्ये Google सेवा नाही आणि युजर्सला त्यांचे स्वतःचे अॅप्स इंस्टॉल करण्याची परवानगी देते.

संबंधित बातमी: 

 Source link

Leave a Comment