हॉट्सअॅपनं आता नवे फिचर जाहीर केलेत. एका ग्रुपमध्ये आता १०२४ सदस्य जोडता येणार आहेत. तर व्हॉट्सअॅपच्या व्हीडिओ कॉलवर आता ३२ जण सहभागी होऊ शकतील. व्हॉट्सअपची मालकी असलेल्या मेटा कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी नव्या फिचर्सबाबत काल ही घोषणा केली. व्हॉट्सऍपवर आता 2 जीबीपर्यंत फोटो, व्हिडिओ आणि डॉक्युमेंट्स शेअर करता येणार आहेत. व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये इन-चॅट पोलदेखील घेता येणार आहे. या फीचरच्या माध्यमातून ग्रुपमधील सदस्य एखाद्या प्रश्नावर आपले मत नोंदवू शकणार आहेत. व्हॉट्सऍपने हे फीचर कसे दिसेल आणि त्याची कार्यक्षमता अद्याप उघड केलेली नाही. नवीन फीचर्ससाठी व्हॉट्सऍप अपडेट करावे लागेल.