HMD Global Just Launched Nokia X30 5G For A Price Of Rs 48999


Nokia X30 5G : HMD Global ने भारतात एक नवीन X-सीरीज स्मार्टफोन लॉन्च केला आहे, ज्याचे नाव Nokia X30 5G आहे. कंपनीने हा फोन गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च केला होता. आता तब्बल पाच महिन्यांनंतर कंपनीने हा नवीन डिव्हाईस भारतात सादर केला आहे. फोनची खासियत म्हणजे हा Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर सह सादर करण्यात आला आहे. या फोनची बाजारात आधीपासून असलेल्या OnePlus 10T आणि iQoo 9T शी स्पर्धा आहे. कसा आहे Nokia चा हा नवीन फोन जाणून घुले…

Nokia X30 5G किंमत

Nokia X30 5G भारतात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजच्या एकाच प्रकारात लॉन्च करण्यात आला आहे. या फोनची प्री-बुकिंग सुरु झाली आहे. हा फोन क्लाउडी ब्लू आणि आइस व्हाईट कलर व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनची किंमत 48,999 रुपये आहे. फोनवर प्री-लॉन्च ऑफर देखील उपलब्ध आहे. एचएमडी ग्लोबल फोनवर 6,500 रुपये किमतीचे फायदे देत आहे, ज्यामध्ये डिव्हाइस प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी स्मार्टफोनवर 1,000 रुपये सूट आणि 2,799 रुपयांचे नोकिया कम्फर्ट इयरबड्स आणि 2,999 रुपयांचे 33W चार्जर यांचा समावेश आहे. 21 फेब्रुवारीपासून डिव्हाइसची शिपिंग सुरू होईल.

Nokia X30 5G फोन 20 फेब्रुवारीपासून Amazon आणि Nokia.com वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. लॉन्च ऑफरचा एक भाग म्हणून कंपनी Amazon वरील सर्व ग्राहकांना 33W नोकिया फास्ट वॉल चार्जर मोफत देणार आहे. याशिवाय कंपनी कोणत्याही स्मार्टफोनच्या एक्सचेंजवर 4,000 रुपयांची सूट देत आहे.

Nokia X30 5G चे स्पेसिफिकेशन 

  • डिस्प्ले: 1080 x 2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.43-इंच FHD+ AMOLED डिस्प्ले, 20:9 Aspect ratio
  • रिफ्रेश रेट: 90Hz चा स्क्रीन रिफ्रेश रेट 
  • ब्राइटनेस: 700 निट्स ब्राइटनेस
  • प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर
  • RAM आणि स्टोरेज: 8GB RAM आणि 256GB स्टोरेज
  • ऑपरेटिंग सिस्टम: अँड्रॉइड 12 मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम आउट-ऑफ-द-बॉक्स
  • कनेक्टिव्हिटी: ब्लूटूथ v5.1, eSIM, USB Type-C (USB 2.0), आणि ड्युअल-बँड WiFi
  • चार्जिंग: 33W चार्जर
  • बॅटरी: 4,200mAh बॅटरी

Nokia X30 5G चा कॅमेरा

नवीन लॉन्च फोनमध्ये ड्युअल-रीअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लाससाठी DX+ सपोर्टसह 50MP प्युअरव्ह्यू OIS कॅमेरा आणि 123-डिग्री फील्ड ऑफ व्ह्यूसह 13MP अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा समाविष्ट आहे. फोनमध्ये फ्रंटला 16MP सेल्फी कॅमेरा आहे. फोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लाससह येतो. एचएमडी ग्लोबल या स्मार्टफोनसाठी तीन वर्ष ओएस अपग्रेड देणार आहे.Source link

Leave a Comment