Green Comet Ztf Closest To Sun Rare Astronomical Event


Green Comet : अंतराळामध्ये (Space) अनेक रहस्य लपलेली आहेत, असं म्हटलं जातं. अंतराळामध्ये अशा अनेक गोष्टी आहे, ज्या अदयापही मानवी नजरेसमोर आलेल्या नाहीत. अंतराळात फार अनोख्या घटना पाहायला मिळतात. जगभरातील शास्त्रज्ञांकडून अंतराळासंदर्भात संशोधन सुरु आहे. यातून नवनवीन माहिती समोर येत असते. नुकताच अंतराळामध्ये एक अद्भुत दृश्य पाहायला मिळालं आहे. 50 हजार वर्षांनंतर एक धुमकेतू (Comet) पृथ्वीच्या (Earth) जवळून गेला आहे. खगोलप्रेमींसाठी ही एक पर्वणी मानली जाते. कारण हा धुमकेतून याआधी 50 हजारपूर्वी पाषणयुगात पृथ्वीजवळून गेला होता, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. खगोलप्रेमींसह वैज्ञानिकांमध्ये देखील याबाबत मोठी उत्सुकता आहे. 

सुमारे 50 हजार वर्षांनंतर दिसलं अदभूत दृष्यं

50 हजार वर्षानंतर पृथ्वीच्या जवळून हिरव्या रंगाचा धूमकेतू गेला आहे. लडाखमधील हानले येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सच्या (IIA) शास्त्रज्ञांनी हिरव्या धूमकेतूचे फोटो टिपले आहेत. यासाठी खास दुर्बिणीचा वापर करण्यात आला. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, नेमकी हीच घटना निएंडरथल मानवाच्या काळात घडली घडली होती, तेव्हा अंतराळ विज्ञान याबाबतची माहिती सुद्धा नव्हती.

26 दशलक्ष मैल दूर होता हिरवा धूमकेतू 

अंतराळ शास्त्रज्ञांनी या हिरव्या रंगाच्या धूमकेतूचा शोध मार्च 2022 मध्ये लागला. या धूमकेतूला C/2022 E3 (ZTF) असे नाव देण्यात आले आहे. कॅलिफोर्नियाच्या झ्विकी ट्रान्झियंट फॅसिलिटीच्या शास्त्रज्ञांनी मार्च 2022 मध्ये हा धूमकेतू शोधला आणि तेव्हापासून ते या धूमकेतूचा मागोवा घेत आहेत. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, या धूमकेतूला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यास बराच वेळ लागतो. यावेळी हा धूमकेतू पृथ्वीपासून सुमारे 26 दशलक्ष मैल दूर गेला. शास्त्रज्ञांच्या मते, हिरव्या धूमकेतूला सूर्याभोवती त्याची कक्षा पूर्ण करण्यासाठी हजारो वर्षे लागतात. याआधी हा धूमकेतू 50 हजार वर्षाआधी दिसला होता. यानंतर हा धूमकेतू कधी दिसेल हे सांगता येत नाही.

IIA ने टिपले दृष्य

भारतीय खगोल भौतिकशास्त्र संस्थाने (IIA) लडाखमधील हानले येथे हा हिरवा धूमकेतू पृथ्वीजवळून प्रवास करत असतानाचे सुंदर फोटो टिपले आहेत. IIA बेंगळुरू येथील खगोलशास्त्रज्ञांनी हिरवा धूमकेतू पाहिला. यासाठी शास्त्रज्ञांनी हिमालयन मून टेलिस्कोपचा वापर केला. शास्त्रज्ञांनी सांगितले की, हा हिरवा धूमकेतू त्याच्या ग्रहांसह सूर्याभोवती फिरत आहे.





Source link

Leave a Comment