Google May Launch Its Powerful AI On This February Date


Google AI Launch Date : चॅट जीपीटीने बाजारात खूप लोकप्रियता मिळवली आहे. काही महिन्यांतच हे एआय टूल इतके प्रसिद्ध झाले की गुगल आणि चॅट जीपीटीची तुलना होऊ लागली. चॅट जीपीटी काही वर्षांत गुगलला मागे टाकेल असा अंदाजही अनेकांनी वर्तवला होता. त्यामुळे गुगलचे टेन्शनही वाढले आणि गुगलने आपला एआय चॅटबॉट सादर करण्याची घोषणा केली. गुगलच्या एआय चॅटबॉटबद्दल बरीच चर्चा झाली आहे. आता त्याच्या लॉन्च डेटशी संबंधित माहिती समोर आली आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी अलीकडेच सांगितले की, लवकरच लोक नवीन सर्वात पॉवरफुल मॉडेलसह एक्स्पेरिमेंट आणि इनोवेटिव्ह पद्धतीने सर्च करण्यास सक्षम होतील.     

Google AI Launch Date : Google चे AI कधी लॉन्च होणार? 

The Verge च्या ताज्या रिपोर्टनुसार, Google 8 फेब्रुवारी रोजी सर्च आणि AI शी संबंधित कार्यक्रम आयोजित करणार आहे. या रिपोर्टमध्ये या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशनही शेअर करण्यात आलं आहे. ज्यात माहिती देण्यात आली आहे की, या पॉवरफुल AI च्या मदतीने लोक जलद गतीने कोणतीही गोष्ट सर्च करून काही सेकंदातच हवी असलेली माहिती मिळू शकतात. The Verge मध्ये पाठवण्यात आलेल्या इन्व्हिटेशननुसार, 40 मिनिटांचा हा कार्यक्रम 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 ET  (भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजत ) YouTube वर प्रसारित केला जाईल.

दरम्यान, सध्या AI चॅटबॉट ChatGPT या अॅपची जोरदार चर्चा सुरु आहे. हे अॅप खूप लोकप्रिय होत असून अॅप स्टोअरवर याचे डाऊनलोडस ही वाढले आहेत. तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की, हे नेमकं काय आहे? तर हे एक सॉफ्टवेअर आहे, त्याचे पूर्ण नाव Generative Pretrained Transformer आहे. तुम्ही याला आधुनिक न्यूरल नेटवर्क आधारित मशीन लर्निंग मॉडेल (Neural network based machine learning model) असेही म्हणू शकता. हे सॉफ्टवेअर तुम्हाला गुगल प्रमाणे रिअल टाईम सर्च तर देतेच शिवाय तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही अगदी स्पष्ट आणि नेमक्या शब्दात देतं. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत या अॅपने 10 लाख युजर्स मिळवले होते. मानवी संवादाची नक्कल करून आणि Google च्या मूळ सर्च   व्यवसायाला धोका निर्माण करून व्यावसायिक लेखकांची जागा घेण्याच्या त्याच्या संभाव्यतेबद्दल देखील अनुमान लावले गेले आहे. 

हेही वाचा: 

Chinese Internet of Things : चीनचं नवं शस्त्र जगासाठी धोक्याची घंटा; इंटरनेट नेटवर्कचा हेरगिरीसाठी वापर, समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती

 Source link

Leave a Comment