Google Doodle: आज (31 डिसेंबर) 2022 या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. 2022 वर्ष संपायला अवघे काही तास शिल्लक आहेत. लोक नव्या वर्षाच्या स्वागतासाठी (New Year Celebration) सज्ज झाले आहेत. 2022 ला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी गूगलनं देखील डूडल (Google Doodle) तयार केलं आहे. या गूगल (Google) डूडलमध्ये काय आहे खास? ते जाणून घेऊयात…
नवं वर्षाच्या स्वागतासाठी तयार करण्यात आलेल्या गूगल डूडलमध्ये तुम्हाला वेगवेगळे रंग, लाइट्स तुम्हाला दिसतील. गूगल डूडलमध्ये लिहिण्यात आलेल्या गूगलच्या स्पेलिंगमध्ये तुम्हाला G हे लेटर निळ्या रंगात तर O हे लेटर लाल रंगात दिसेल, तसेत L आणि E हा रंग लाल रंगात दिसत आहे. तसेच O या एक लेटरमध्ये 2022 असं लिहिलेलं दिसत आहे. या डूडलवर क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रिनवर स्पार्किंल होईल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गूगल सर्च बारवर New Year’s Eve 2022 असं लिहिलेलं दिसेल. या गूगल डूडलनं अनेकांचे लक्ष वेधले.
पाहा डूडल
Neuer Google Doodle, Thema “Silvester 2022” 🙂#google #doodle #designhttps://t.co/9QM0b7YfY0 pic.twitter.com/jZnz8N3dJb
News Reels
— Google Doodles DE (@Doodle123_DE) December 30, 2022
वेगवेगळ्या थीमवर आधारित असलेले गूगल डूडल्स नेहमीच यूझर्सचे लक्ष वेधत असतात. वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये गूगल डूडल तयार केले जातात. ख्रिसमस (Christmas Day) , न्यु इअर (Happy New Year) यांसारख्या खास दिवशी गूगल हे त्यांच्या डूडमधून युझर्सला शुभेच्छा देते. कोणतीही गोष्ट गुगलवर सर्च केल्यावर अगदी काही सेकंदांमधअये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळते.
आपण सर्वजण सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष 2023 चं स्वागत करण्यासाठी (New Year Celebration) सज्ज झालो आहोत. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी देवदर्शनासाठी भाविकांनी (Devotees) मोठी गर्दी केली आहे. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनाने करण्याला नागरिकांनी पसंती दिली आहे. तर काही लोक हे नवं वर्षाचं स्वागत विविध संकल्प करुन करत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: