Google Doodle Celebrates Maria Telkes Birthday Know About Scientist And Biophysicist Sun Queen


Google Doodle On Maria Telke: सर्च इंजिन गूगलनं (Google) आज (12 डिसेंबर) एक खास डूडल तयार केलं आहे. आज द सन क्वीन अशी ओळख असणाऱ्या मारिया टेलकेस (Maria Telkes)  यांची 122 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गूगलनं हे डूडल तयार केलं आहे. मारिया टेलकेस यांनी सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये विशेष योगदान दिलं. त्यांच्या सौर ऊर्जा क्षेत्रमधील कार्यामुळे त्यांना ‘द सन क्वीन’ असं संबोधलं जातं. 

कोण आहेत मारिया टेलकेस? 

मारिया टेलकेस यांचा जन्म 12 डिसेंबर 1900 मध्ये बुडापेस्टमधील हंगेरी येथे झाला. 1920 मध्ये त्यांनी बी.ए.ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर 1924 मध्ये बुडापेस्ट विद्यापीठातून  मारिया टेलकेस यांनी पीएचडी केली.  मारिया यांनी  युनायटेड स्टेट्समध्ये जाऊन बायोफिजिस्ट (Biophysicist) म्हणून काम केले. 1937 मध्ये मारिया यांनी अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं. त्यानंतर मारिया टेलकेस यांनी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मध्ये सौर ऊर्जा समितीच्या सदस्या म्हणून आपली कारकीर्द सुरू केली.  

News Reels

दुसऱ्या महायुद्धादरम्यान,  त्यांना अमेरिकन सरकारने सौर डिस्टिलर विकसित करण्यास मदत करण्यासाठी बोलावले होते, ज्यामुळे समुद्राचे पाणी गोड्या पाण्यात बदलले. त्यावेळी हा जीवनरक्षक शोध पॅसिफिक थिएटरमध्ये तैनात असलेल्या सैनिकांनी वापरला होता.

MIT मध्ये काम करत असताना मॅसॅच्युसेट्सच्या एका प्रयोगामध्ये त्या सामील झाल्या. हा प्रयोग अयशस्वी झाला, तिला एमआयटीच्या सौर ऊर्जा संघातून काढून टाकण्यात आले. वास्तुविशारद एलेनॉर रेमंड यांच्यासोबत 1948 मध्ये  मारिया टेलकेस यांनी एक प्रणाली तयार केली जी सूर्यप्रकाशापासून भिंती गरम करू शकते. तसेच त्यांनी असा ओव्हन तयार केला, जो सौरऊर्जेवर चालू शकतो. तो सोलर ओव्हन लोक वापरत आहेत. या मारिया टेलकेस यांच्या संशोधनामुळे त्यांना ‘द सन क्वीन’  म्हटलं जातं. त्यांच्याकडे 20 हून अधिक पेटंट आहेत. काही ऊर्जा कंपन्यांसाठी सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केले. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Google Doodle Today: जगातील पहिले व्हिडीओ गेम कन्सोल बनवणाऱ्या गेराल्ड जॅरी लॉसन यांची जयंती; गूगलचं खास डूडल

Source link

Leave a Comment