Google Celebrates Popularity Of Bubble Tea Through Interactive Doodle


Google Doodle: टँगी, फ्रुटी, स्विट आणि मिल्की अशा फ्लेवर्सचा ‘बबल टी’ (Bubble Tea) प्यायला अनेकांना आवडतो. बबल टी हा बोबा टी (Boba Tea) आणि पर्ल मिल्क टी (Pearl Milk Tea) या नावानं देखील ओळखला जातो. फ्रुट जेली किंवा टॅपिओकाने ‘बबल टी’मधील बबल बॉल तयार केले जातात. बबल टीने जागतिक स्तरावर इतकी लोकप्रियता मिळवली की, 30 जानेवारी 2020 रोजी ‘बबल टी’ला अधिकृतपणे ‘न्यू इमोजी’ म्हणून घोषित करण्यात आले. म्हणून गूगलनं आज ‘बबल टी’चं एक खास डूडल (Google Doodle) तयार केलं आहे. या डूडलमध्ये तैवानचा फॉर्मोसन माउंटन डॉग (Taiwanese Formosan Mountain Dog) देखील दिसत आहे. गूगल डूडलच्या ट्विटर अकाऊंटवर या डूडलची माहिती देण्यात आली आहे. 

गूगलचं खास डूडल

बबल टीच्या खास गूगल डूडलच्या माध्यमातून तुम्ही बबल टी तयार करू शकता. यासाठी तुम्हाला गूगल डूडलवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला एक व्हिडीओ दिसेल. त्या व्हिडीओमध्ये फॉर्मोसन माउंटन डॉग आणि त्याचे टी शॉप तुम्हाला दिसेल. त्यानंतर फॉर्मोसन माउंटन डॉगच्या टी शॉपमध्ये येणाऱ्यांसाठी तुम्हाला बबल टी तयार करायची आहे. हे टी शॉप बंद होण्यापूर्वी तुम्हाला पाच ऑर्डर पूर्ण करायच्या आहेत. त्यासाठी स्क्रिनवर येणाऱ्या साहित्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल, त्यानंतर तुमचा बबल टी तयार होईल.

गूगलनं बबल टीच्या डूडलचा मेकिंग व्हिडीओ देखील शेअर केला आहे. यामध्ये बबल टीचं डूडल कसं तयार झालं? हे दाखवण्यात आलं आहे. 

पाहा व्हिडीओ: 

बबल टी टॅपिओका बॉल्सपासून बनविला जातो. हे टॅपिओका बॉल्स साबुदाण्यासारखे असतात. त्यांना सुमारे 20 मिनिटे पाण्यात शिजवावे लागते, नंतर त्यांना दुधाच्या चहामध्ये टाकून त्यात  बर्फाचे तुकडे टाकावे लागतात. या थंड पेयाची चव गोड असते.

महत्वाच्या इतर बातम्या :

Republic Day 2023: 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गूगलचं खास डूडल; पाहा गुजरातच्या कलाकाराची कला





Source link

Leave a Comment