Gene Editing Technology China Making Its Soldiers Inhuman Gene Editing All You Need To Know


Gene Editing Technology : सध्या जीन एडिटिंग (Gene Editing) तंत्रज्ञानाची खूप चर्चा आहे. पण याबाबत बहुतेक लोकांना सविस्तर माहिती नाही. जीन एडिटिंग असं तंत्रज्ञांन आहे, ज्यामध्ये नैसर्गिक रचनांमध्ये बदल केला जाऊ शकतो. या तंत्रज्ञानामुळे डीएनएमध्ये (DNA) बदल केला जाऊ शकतो. या तंत्रज्ञानाद्वारे डीएनएमधील काही गोष्टी काढून टाकल्या जाऊन शकतात किंवा आवश्यक गोष्टी त्यामध्ये वाढवल्या जाऊ शकतात. एका रिपोर्टनुसार, चीन (China) गुप्तपणे जीन एडिटिंगवर काम करत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करुन चीन युद्धामध्ये इतर देशांवर वरचढ ठरू शकतो. DNA मध्ये बदल करुन चीन ‘हायब्रिड सैनिक’ बनवत असल्याचं एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

काय आहे जीन एडिटिंग? ( What is Gene Editing? )

जीन एडिटिंगला जीनोम एडिटिंग असंही म्हणतात. जीन एडिटिंग म्हणजे मानवी गुणसूत्रांमधील बदल. मानवी शरीरात जनुकांचा एक घटक असतो, याला जीन्स म्हणतात. जीन्सच्या समूहाला गुणसूत्र म्हणतात. गुणसूत्र ही सजीवांच्या शरीरातल्या पेशींमध्ये आढळणारी डीएनए आणि प्रथिनांची संघटित संरचना आहे. या नैसगिक संरचनेच बदल करणे म्हणजे जीन एडिटिंग. जीन एडिटिंगमध्ये डीएनएमधील गुणसूत्रं हटवली जातात किंवा वाढवली जातात.

तुम्ही जर बॉलिवूडचा ‘क्रिश 3’ (Krrish 3) चित्रपट पाहिला असेल, तर जीन एडिटिंग तंत्रज्ञान कशा प्रकारे काम करत याचा तुम्हाला अंदाज येईल. या चित्रपटामध्ये जीन एडिटिंग तंत्रज्ञानाचा उल्लेख आहे. या चित्रपटात तुम्ही पाहिलं असेल की, माणूस आणि प्राण्याचे डीएनए एकत्र करुन मानव आणि प्राण्याचे मिळून अशी हायब्रिड प्रजाती मानवीर तयार करण्यात येते. प्राण्यांच्या डीएनएमध्ये बदल करण्यात येतो, त्यामधील नको असलेल्या गोष्टी काढून त्यामध्ये हवे असलेले जीन्स वाढवले जातात. जीन एडिटिंग तंत्रज्ञानही काहीस अशाच प्रकारे काम करतं. 

जीन एडिटिंगद्वारे संकरित प्रजाती निर्माण करण्याचा प्रयत्न

जगातील अनेक प्राण्यांवर जीन एडिटिंग तंत्रज्ञानाची चाचणी करण्याची तयारी सुरु आहे. गरज असेल तेव्हा या तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आलेल्या प्रजाती वापरल्या जातील. जीन एडिटिंग तंत्रज्ञानाचा वापर केवळ प्राण्यांवरच नाही तर वनस्पतींवरही करुन नवीन हायब्रिड (Hybrid) म्हणजे संकरित प्रजाती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

News ReelsSource link

Leave a Comment