Follow These Steps To Search Your Polling Booth Location Marathi News


Polling Booth Location on Mobile : देशात निवडणुकीचे (Election 2022) वातावरण सुरुच असते. कधी लोकसभा निवडणुका, कधी विधानसभा निवडणुका, तर कधी अन्य निवडणुका. अशा परिस्थितीत दरवर्षी मतदार यादीत अनेक नवीन नावे समाविष्ट होत असतात. मात्र, यामध्ये नवीन मतदारांमध्ये पहिल्यांदाच मतदान करण्याबाबत संभ्रम निर्माण होतो. म्हणूनच या ठिकाणी आम्ही तुम्हाला एक सोपा मार्ग सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही कुठेही न जाता तुमच्या मतदान केंद्राची माहिती मिळवू शकाल.

मतदान केंद्राची माहिती

जर तुम्ही पहिल्यांदा मतदान करण्यास पात्र ठरलात. तर तुमची मतदार यादीत नोंदणी केली जाते आणि तुमचे मतदार कार्ड बनवले जाते. या मतदार कार्डावर तुमच्या प्रभागाची माहिती दिली जाते. त्यामुळे मतदान केंद्र सहज ओळखता येते. मतदान केंद्राची जागा क्वचितच बदलली जाते.

तुम्ही तुमच्या मतदान केंद्राबद्दल दोन सोप्या पद्धतींनी जाणून घेऊ शकता. सर्वप्रथम, तुम्ही इंटरनेटवर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर मतदान केंद्र शोधू शकता. तुम्ही दुसरे व्होटर हेल्पलाईन अॅप डाऊनलोड करून देखील हे जाणून घेऊ शकता. हे अॅप अॅपल अॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअर या दोन्हींवरून मोफत डाऊनलोड करता येईल.

News Reels

वेबसाईटवर असे शोधा : 

  • सर्वप्रथम निवडणूक आयोगाची वेबसाईट ओपन करा.
  • वेबसाईटवर प्रवेश करून, मतदार पोर्टलवर जा (voterportal.eci.gov.in)
  • मतदाराला येथे लॉग-इन करावे लागेल (मतदार ओळखपत्र किंवा ई-मेल किंवा मोबाईल वापरून)
  • येथे तुम्हाला Find My Polling Station हा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला मतदार कार्डावरील तपशीलांच्या मदतीने तुमचे मतदान केंद्र सहज सापडेल. तुम्हाला हवे असल्यास, मतदार मतदान स्लिप डाऊनलोड करू शकतात.

अॅपवर असे शोधा : 

  • यासाठी, प्रथम तुमच्या स्मार्टफोनवर (Android/iOS) मतदार हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा आणि त्यावर लॉग इन करा.
  • अॅप लॉगिन केल्यानंतर EPIC N0., मोबाईल नंबर किंवा ई-मेल वापरा.
  • त्यानंतर सर्च वर क्लिक करून दिलेल्या पर्यायांपैकी कोणताही एक निवडा.
  • यानंतर अॅपवर मागितलेली माहिती भरा. मतदार कार्डावरील माहितीमुळे तुम्ही मतदान केंद्र सहज शोधू शकता.

महत्त्वाच्या बातम्या : 

OK Full Form : बोलण्यात प्रत्येक वेळी वापरला जाणारा शब्द म्हणजे ‘OK’; पण या शब्दाचा Full Form तुम्हाला माहित आहे का? नसेल तर आत्ताच वाचाSource link

Leave a Comment