Fake ChatGPT App Becomes One Of The Most Popular Apps What Is ChatGPT Find Out


ChatGPT App: सध्या AI चॅटबॉट ChatGPT या अॅपची जोरदार चर्चा सुरु आहे. हे अॅप खूप लोकप्रिय होत असून अॅप स्टोअरवर याचे डाऊनलोडस ही वाढले आहेत. हे अॅप वापरणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आयफोन यूजर्सची संख्या आहे. या अॅपद्वारे युजर्सची फसवणूक केली जात असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. MacRumors ने दिलेल्या रिपोर्टनुसार, हे अॅप आणखी विकसित होत असून मोठ्या प्रमाणात युजर्स याकडे आकर्षित होत आहेत.   

ChatGPT काय आहे?

हे एक सॉफ्टवेअर आहे, त्याचे पूर्ण नाव Generative Pretrained Transformer आहे. तुम्ही याला आधुनिक न्यूरल नेटवर्क आधारित मशीन लर्निंग मॉडेल (Neural network based machine learning model) असेही म्हणू शकता. हे सॉफ्टवेअर तुम्हाला गुगल प्रमाणे रिअल टाईम सर्च तर देतेच शिवाय तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही अगदी स्पष्ट आणि नेमक्या शब्दात देतं. अॅप स्टोअरवर युजर्स मोठ्या प्रमाणात याला आपली पसंती दर्शवत आहे. अनेक लोकांनी या अॅपबद्दल सकारात्मक रिव्ह्यू दिले आहेत. अमेरिकेतील 12000 पेक्षा जास्त युजर्सनी ChatGPT ला अॅप स्टोअरवर 5 पैकी 4.6 रेटिंग दिली आहे. तर भारतात 500 हुन अधिक युजर्सने या अॅपला 5 पैकी 4.4 रेटिंग दिली आहे. 

लॉन्च होताच मिळवले 10 लाख युजर्स

नोव्हेंबर 2022 मध्ये लॉन्च झाल्यापासून ChatGPT ने इंटरनेटवर लोकप्रिय होत आहे. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत या अॅपने 10 लाख युजर्स मिळवले होते. मानवी संवादाची नक्कल करून आणि Google च्या मूळ सर्च   व्यवसायाला धोका निर्माण करून व्यावसायिक लेखकांची जागा घेण्याच्या त्याच्या संभाव्यतेबद्दल देखील अनुमान लावले गेले आहे. ते तयार करणाऱ्या संस्थेच्या सहसंस्थापकांमध्ये इलॉन मस्क आणि सिलिकॉन व्हॅलीचे गुंतवणूकदार सॅम ऑल्टमन यांचा समावेश आहे. ही संस्था आपल्या तंत्रज्ञानाच्या परवान्याच्या बदल्यात विकासकांकडून पैसे घेते.

news reels

मायक्रोसॉफ्ट करणार 10 अब्ज डॉलर्स गुंतवणूक? 

नवीन तंत्रज्ञान OpenEye च्या GPT-3 Language च्या मॉडेलवर विकसित केले आहे. कंपनीच्या Dal-e इमेज जनरेटिंग मॉडेलने सर्जनशील उद्योगांना AI लागू करण्याबद्दल वादविवाद सुरू आहेत. ओपनएआय आधीपासूनच Natural Language प्रक्रियेसाठी GPT-4 च्या अपग्रेडवर काम करत आहे. तरच मायक्रोसॉफ्ट कॉर्प ChatGPT ची निर्माता कंपनी OpenAI सोबत यामध्ये 10 अब्ज डॉलर्स गुंतवणूक करण्यासाठी चर्चा करत आहे. मायक्रोसॉफ्टने यापूर्वी OpenAI मध्ये सुमारे 1 बिलियनची गुंतवणूक केली आहे. 

 

 



Source link

Leave a Comment