Facebook Parent Meta Plans To Cut Thousands Of Jobs In Fresh Layoffs


Meta Fresh Layoffs : दिग्गज टेक कंपनी (Technology Company) मेटा (Meta) पुन्हा एकदा नोकरकपात (Layoffs) करण्याच्या तयारीत आहे. फेसबुक (Facebook), व्हाट्स ॲप (Whats App) आणि इंस्टाग्रामची (Instagram) मूळ मालक कंपनी मेटा पुन्हा एकदा हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मेटा कंपनी लवकरच हजारो कर्मचाऱ्यांची छाटणी करू शकते. या आधीही कंपनी सुमारे 10000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. आता पुन्हा एकदा मेटा कंपनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार असल्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांचं भविष्य टांगणीला लागलं आहे.

दरम्यान, मेटा कंपनीने 2022 वर्षा अखेरीस 11,000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली. कंपनीने नोव्हेंबर महिन्यामध्ये 13 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकलं होतं. जागतिक मंदीची भीती आणि कंपनीच्या महसुलात झालेली घट पाहता नोकरकपात केल्याचं स्पष्टीकरण कंपनीनं दिलं होतं. मेटा कंपनीनं 11 हजार कर्मचाऱ्यांना काढून टेक कंपन्यांमधील सर्वात मोठी छाटणी केली होती. कंपनीने खर्चात कपात करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या छाटणीचा निर्णय घेतला होता. 

हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

मेटा कंपनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मजबूत करण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेत आहे. यामुळे कंपनी आता 1000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची शक्यता आहे. या आठवडाभरात ही नोकरकपात करण्यात येऊ शकते आणि लवकरात लवकर अंतिम निर्णय होऊ शकतो, असं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. अहवालानुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यासाठी यादी तयार करण्यास सांगितल्याची माहितीही समोर आली आहे.

कमी केलेल्य कर्मचाऱ्यांना मिळेल बोनस

छाटणी केलेल्या कर्मचाऱ्यांनाही बोनस दिला जाईल, असं अहवालात म्हटलं आहे. यासोबतच कंपनी कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना काही महिन्यांचा पगारही देऊ शकते. जागतिक मंदीच्या भीतीमुळे अनेक मोठ्या कंपन्यांकडून नोकरकपात करण्यात आली आहे. याशिवाय इतरही अनेक कंपन्या छाटणीच्या तयारीत आहेत. दररोज हजारो लोकांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. सुरुवातीला टेक कंपन्यांमध्ये नोकरकपातीचं सत्र सुरु झालं. त्यानंतर आता सर्व क्षेत्रातील कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत.

नोकरकपातीचं कारण काय?

कंपनी दुसऱ्यांदा नोकरकपातीच्या तयारीत आहे. पहिल्यांदा कर्मचार्‍यांची छाटणी करताना कंपनीने सांगितलं होतं की मंदीच्या भीतीने आणि नुकसानीमुळे नोकरकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, कंपनी आपला व्यवसाय आणखी मजबूत करण्यासाठी कंपनी अनेक प्रयत्न करत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Facebook : फेसबुकने 11 हजार कर्मचारी कमी करण्यामागचं सांगितलं कारण; ‘या’ आहेत पाच महत्त्वाच्या गोष्टीSource link

Leave a Comment