Elon Musk Twitter Deal Buy Latest Update News


Elon Musk Twitter Deal : बहुचर्चित ट्विटर डील (Twitter Deal) पूर्ण होण्याची शक्यता आहे. टेस्लाचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter)) खरेदी करण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता पुन्हा ही डील पूर्ण होण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्ग न्यूजच्या रिपोर्टनुसार, एलॉन मस्क ट्विटर खरेदी करु शकतात. मस्क यांनी ट्विटर कंपनीला 54.20 डॉलर प्रति शेअर किमतीने ट्विटर खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. यानंतर ट्विटर कंपनीच्या शेअर्सच्या किंमतींत वाढ झाल्याचं पाहाया मिळालं. ट्विटरच्या शेअर्सची किंमत 13 टक्क्यांनी वाढून 47.95 प्रति डॉलरपर्यंत पोहोचली आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरसोबतचा करार मोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता हा करार पूर्ण होण्याचे संकेत मिळत आहेत. आता पुन्हा एकदा मस्क यांनी सुरुवातीला ट्विटरला दिलेल्या ऑफरच्या किमतीत म्हणजे 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटर खरेदी करण्याचा प्रस्ताव ट्विटरला दिला आहे. ही एलॉन मस्क यांची माघार असल्याचं पाहायला मिळतंय.

मस्क यांच्याकडून ट्विटरला डील पूर्ण करण्यासाठी पत्र

एलॉन मस्क यांनी ट्विटर डील मोडल्यानंतर ट्विटरने हे प्रकरण कोर्टात नेलं.  मस्क आणि ट्विटर यांच्यातील वादानंतर या महिन्यापासून अमेरिकन कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू होणार आहे. मात्र याआधी मस्क यांनी ट्विटर कंपनीला पत्र लिहित ट्विटर डील खरेदी करण्याची ऑफर दिल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये नव्या डीलबाबतच्या सर्व गोष्टींचा तपशीलवार खुलासा करण्यात आला आहे. मात्र, याबाबत ट्विटर किंवा एलॉन मस्क यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मस्क यांनी टेस्लाचे शेअर्स विकले

मीडिया रिपोर्टनुसार, एलॉन मस्क यांनी त्यांची कंपनी टेस्लाचे सात बिलियन डॉलर्स किमतीचे शेअर्स विकल्याची माहिती समोर आली होती. या विक्रीतून एलॉन मस्क यांना 6.9 बिलियन डॉलर रक्कम मिळाली. यामुळे एलॉन मस्क पुन्हा ट्विटर डील पूर्ण करणार का याबाबत चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता एलॉन मस्क 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटर डील खरेदी करणार असल्याचं म्हटलं जातं आहे.

ऑक्टोबरपासून खटल्यावरील सुनावणीला सुरुवात

टेस्लाचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर डील (Twitter Deal) रद्द केली आहे. त्यानंतर ट्विटरनं हा वाद आता कोर्टात नेला. या प्रकरणात 17 ऑक्टोबरपासून खटल्यावरील सुनावणीला सुरुवात होणार आहे. एलॉन मस्क आणि ट्विटर यांच्यातील 44 अब्ज डॉलरचा करार सुरुवातीपासूनच चर्चेत होता, पण मस्क यांनी ट्विटर डील मोडली. ट्विटरने मस्क यांना कंपनीबाबत पुरेशी आणि योग्य माहिती न दिल्याने मस्क यांनी ट्विटर करार मोडण्याची घोषणा केली होता. याविरोधात ट्विटरने कोर्टात धाव घेतली. त्यानंतर आता पुन्हा ही ट्विटर डील सुरुवातीला ऑफर केलेल्या 44 अब्ज डॉलरच्या किमती खरेदी करण्याची ऑफर मस्क यांनी ट्विटर कंपनीला दिली आहे. आता 17 ऑक्टोबरपासन ट्विटरने कोर्टात दाखल केलेल्या खटल्यावर सुनावणी पार पडणार आहे, त्याआधी हे प्रकरण मिटवण्यासाठी म्हणून मस्क यांनी ट्विटरला ऑफरचं पत्र पाठवत सुरुवातीला ठरलेल्या मूळ किमतीत म्हणजे 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटर खरेदी करण्याची ऑफर दिली आहे.Source link

Leave a Comment