Elon Musk Says Too Many Corrupt Legacy Blue Verification No Choice But To Remove Blue Tick In Coming Months


Twitter Update : जगातील श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटरचे ( Twitter ) नवे मालक एलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी ब्लू टिक ट्विटर अकाऊंट ( Twitter Blue Tick Account ) युजर्सला आणखी एक झटका दिला आहे. ट्विटरवरील ब्लूक टिक अकाऊंटची पडताळणी होणार असून अपात्र ठरणाऱ्या अकाऊंटची ब्लू टिक हटवण्यात येणार आहे. एलॉन मस्क यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. मस्क यांनी ट्विट करत म्हटलंय की, ट्विटरने याआधी दिलेल्या ब्लू टिकची पडताळणी होणार असून पात्र न ठरणाऱ्या अकाऊंटची ब्लू टिक हटवण्यात येईल.

ब्लू टिक अकाऊंट्सची पडताळणी होणार

एलॉन मस्क यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, ‘ट्विटरच्या आधीच्या ब्लू टिक प्रक्रियेमध्ये अने क्षुटी आढळल्या आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये ब्लू टिकची पडताळणी होणार असून पात्र नसणाऱ्यांची ब्लू टिक हटवण्यात येईल.’

पॅरोडी अकाऊंट्सवर मस्क यांचा निशाणा

दरम्यान, ट्विटर सध्या पॅरोडी अकाऊंट्सवर कारवाई सुरु आहे. मस्क यांनी म्हटलं आहे की, पॅरोडी अकाऊंट्स हे लोकांना फसवण्याचं काम करत आहेत. सध्या ट्विटकडून बनावट अकाऊंट्सवर कारवाई सुरु आहे. अनेक बनावट अकाऊंट्स हटवण्यात आले आहेत.

पॅरोडी अकाऊंट्स हटवण्यात येणार

ट्विटरवर अनेक पॅरोडी अकाऊंट ( Parody Twitter Account ) म्हणजे फेक अकाऊंट आहेत. पॅरोडी अकाऊंट म्हणजे एखादं ट्विटर अकाऊंट जे दुसरी व्यक्ती, गट किंवा संस्थेच्या प्रोफाइलचा वापर करुन त्या विषयावर चर्चा करण्यासाठी, उपहासात्मक पोस्ट करण्यासाठी वापरलं जातं. जर कुणी इतरांचा फोटो किंवा माहिती वापरून बनावट खातं बनवून त्याचा वापर करत असेल, तर असे अकाऊंट कायमस्वरूपी हटवण्यात येणार आहेत.

‘कंपनी येत्या काळात अनेक बदल करेल’

एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी खरेदी केल्यापासून मस्क दररोज मोठमोठ बदल करताना दिसत आहेत. एलॉन मस्क यांनी बुधवारी ट्विट करत सांगितलं होतं की, ‘ट्विटर कंपनी येत्या काही महिन्यांत ट्रायल-एंड-एररच्या आधारावर अनेक गोष्टी करेल.’ एलॉन मस्क याधी नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या ट्विटमुळे चर्चेत असायचे. आता ट्विटर डीलमुळे एलॉन मस्क अधिक चर्चे आहेत.





Source link

Leave a Comment