Elon Musk Said I Love When People Complain About Twitter On Twitter


Elon Musk Tweet : जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी ट्विटर कंपनी ( Twitter Deal ) खरेदी केली. ट्विटरचं ( Twitter )  पाखरू एलॉन मस्क यांच्या हाती आल्यापासून मस्क यांनी अनेक मोठे निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला आहे. कंपनीमधून मोठ्या प्रमाणात नोकर कपात ( Twitter Layoffs ), ब्लू टिकसाठी शुल्क ( Twitter Blue Tick Paid Subscription ) हे यातील काही महत्त्वाचे निर्णय आहेत. या निर्णयांमुळे मस्क यांच्यावर नेटकरी प्रचंड संतापल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ट्विटर युजर्सने ट्विट करत मस्क यांनी केलेल्या बदलाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यावर मस्क यांनी आता ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘मला आवडतं, जेव्हा लोक ट्विटरवरच ट्विटरची तक्रार करतात.’

 ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी अनेक नवे नियम लागू केले आहेत. याचा परिणाम लाखो ट्विटर युजर्सवर होत आहे. परिणाम ट्विटर युजर्स ट्विटरवर आपली प्रतिक्रिया मांडत रोष व्यक्त करत आहे. यावर प्रतिक्रिया देताना मस्क यांनी म्हटलं आहे की, जेव्हा लोक ट्विटरवर ट्विटरची तक्रार करतात, ते मला आवडतं.

Reels

इतकंच नाही तर मस्क यांनी त्यांच्या ट्विटरच्या बायोमध्ये बदल करत स्वत:ला ट्विटर तक्रार हॉटलाइन ऑपरेटर ( Twitter Complaint Hotline Operator ) म्हटलं आहे.

‘ट्विटर कंपनी येत्या काळात अनेक गोष्टी करेल’

ट्विटर करार पूर्ण झाल्यापासून एलॉन मस्क दररोज नवनवीन निर्णय लागू करत आहेत. बुधवारी मस्क यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे की, ‘ट्विटर कंपनी येत्या काही महिन्यांत ट्रायल-एंड-एररच्या आधारावर अनेक गोष्टी करेल.’ एलॉन मस्क याधी नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या ट्विटमुळे चर्चेत असायचे. आता ट्विटर खरेदी केल्यावर त्यांची ट्विट अधिकच व्हायरल होतात.

मस्क यांनी ट्विट करत काय सांगितलं?

मस्क यांनी ट्विट करत कंपनीच्या आगामी योजनेबाबत सांगितलं आहे. कंपनीकडून येत्या काळात अनेक बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे कंपनीकडून विविध योजनांवर आणि फिचरवर काम सुरु आहे. याबाबत ट्विट करत एलॉन मस्क यांनी सांगितलं आहे की, ‘कृपया लक्ष द्या! येत्या काही महिन्यांमध्ये कंपनी अनेक मूर्खपणाच्या गोष्टी करणार आहे. त्यातील ज्या गोष्टी योग्य प्रकारे काम करतील त्यांचा वापर करण्यात येईल आणि इतर गोष्टींमध्ये बदल करण्यात येईल.’

ब्लू टिकसाठी दरमहा आठ डॉलर

एलॉन मस्क यांनी अलिकडे ट्विटरवर पेड ब्लू सबस्क्रिप्शन सुरु केलं आहे. त्यासाठी युजरला दरमहा आठ डॉलर शुल्क भरावं लागेल. भारतातही नोव्हेंबर महिना अखेरपर्यंत ही सेवा चालू होऊ शकते. मात्र, पेड ब्लू टिकच्या निर्णयावर नेटकरी नाराज आहेत.

Source link

Leave a Comment