Elon Musk Decided Restore Suspended Accounts Twitter 72 Percent Users Agreed For Amnesty


Elon Musk on Ban Accounts : जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk ) यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून त्यामध्ये अनेक बदल केले आहेत. आता एलॉन मस्क यांनी बॅन अकाऊंटबाबत ( Twitter Ban Accounts ) मोठा निर्णय घेतला आहे. मस्क यांनी ट्विटरवरील बॅन अकाऊंटवरील बंदी (Twitter Suspended Accounts) हटवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटर पोलवरून मस्क यांनी हा निर्णय घेतला आहे. मस्क यांनी ट्विटरवर पोल घेत युजर्सला विचारलं होतं की, बॅन अकाऊंटवरील बंदी हटवावी की नाही. या पोलला 70 टक्के युजर्सने हो असं उत्तर दिलं आहे. त्यानंतर मस्क यांनी बॅन अकाऊंटवरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

मस्क यांनी यासंदर्भात एक ट्विट करत माहिती दिली आहे. मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘जनतेने आपला कौल दिला आहे. पुढील आठवड्यापासून ‘माफी’ला सुरूवात होईल.’ याचा अर्थ पुढील आठवड्यापासून गंभीर चूक किंवा कायदा न मोडणाऱ्या ट्विटवर अकाऊंटवरील बंदी हटवण्यास सुरुवात केली जाणार आहे.

News Reels

मस्क यांनी मतदान घेत विचारला प्रश्न

एलॉन मस्क यांनी बुधवारी (23 नोव्हेंबर) ट्विटरवर एक प्रश्न विचारला की, ‘मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरने इतर निलंबित केलेल्या अकाऊंटना माफी द्यावी की नाही. जर त्यांनी कायदा मोडला नसेल किंवा गंभीर स्पॅममध्ये गुंतले नसेल तर त्यांचं अकाऊंट पुन्हा सुरु करावं का?’

एलॉन मस्क यांच्या ट्विट पोलवरील प्रश्नावर अनेक युजर्सने मतदान केलं. या पोलवरील मतदानाच्या निकालांनुसार, 72.4 टक्के लोक म्हणाले की, जर त्यांनी कायदा मोडला नसेल किंवा गंभीर चूक केली नसेल तर ट्विटरने निलंबित केलेल्या अकाऊंटना पुन्हा परवानगी दिली पाहिजे. तर 27.6 टक्के लोकांनी याच्या विरोधात मतदान केलं

ट्रम्प यांचंही ट्विटर अकाऊंटवरील बंदीही हटवली

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट जानेवारी 2021 मध्ये यूएस कॅपिटल येथे झालेल्या दंगलीनंतर निलंबित करण्यात आलं होतं. मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवरील बंदी हटवून ते पुन्हा रिस्टोर गेलं. यासाठीही मस्क यांनी पोल घेतला होता.





Source link

Leave a Comment