Elon Musk Apple Threatened To Withhold Twitter From Its App Store Marathi News

[ad_1]

Elon Musk On Apple: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अलीकडेच ट्विटर विकत घेतलेले एलॉन मस्क (Elon Musk) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. ट्विटर (Twitter News) विकत घेतल्यापासून एलॉन मस्क यांनी निर्णयांचा धडाका लावला आणि संपूर्ण टेक वर्ल्डमध्ये खळबळ माजली. पण आता एका नव्या ट्वीटमुळं एलॉन मस्क चर्चेत आहेत. एलन मस्क यांनी एक ट्वीट करत अॅपल स्टोअरवर लावण्यात आलेल्या परवानगी आणि कठोर निर्बंध यांसारख्या गोष्टींवर टीका केली आहे. तसेच, मस्क यांनी अप्रत्यक्षरित्या अॅप स्टोअरवरुन (Apple News) ट्विटर हटवण्याचीही धमकी दिली आहे. 

मस्क यांनी अॅप स्टोअरच्या माध्यमातून अॅपलनं घेतलेलं 30 टक्के शुल्क ही बेईमानी असल्याचं म्हटलं आहे. मस्क यांच्या ट्वीटच्या एका सीरीजमध्ये त्यांच्या पहिल्या नावासोबत गाडीच्या मीमचाही सहभाग होता, जे “30 टक्के रक्कम द्या” च्या दिशेनं जाण्याऐवजी “गो टू वॉर” लेबलच्या हायवे ऑफ-रॅम्पवर फिरत होती. मस्कनं हेदेखील म्हटलं आहे की, अॅपलनं ट्विटरला आपल्या अॅप स्टोअरवरुन हटवण्याची धमकी दिली आहे. पण याचं नक्की कारण काय? हे सांगितलं नाही. 

“कायद्याच्या कक्षेतच पोस्ट करावा कंटेंट” 

News Reels

Apple आणि Google दोघांनाही हानिकारक किंवा अपमानास्पद कंटेंट नियंत्रित करण्यासाठी त्यांच्या अॅप स्टोअरवर सोशल नेटवर्किंग सेवा आवश्यक आहेत. स्वतःला “फ्री स्पीच”चे समर्थक म्हणून सांगताना मस्कचा म्हणतात की, कायद्याच्या कक्षेत ट्विटरवर सर्व प्रकारच्या कंटेंटला परवानगी दिली पाहिजे. त्यांनी ट्वीट देखील केले की त्यांनी “भाषण स्वातंत्र्यावर ट्विटर फाईल्स” प्रकाशित करण्याची योजना आखली आहे. परंतु, मस्क यांनी लोकांसोबत शेअर करण्यासाठी त्यांच्याकडे कोणता डेटा आहे, हे स्पष्ट केलेलं नाही.  

Apple च्या सीईओंना केलं टॅग 

मस्क यांनी सोमवारी असा आरोप केला आहे की, “Apple ने “ट्विटरवर जाहिराती देणं थांबवलं आहे.” तसेच, त्यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक (Apple CEO Tim Cook) यांना टॅग करत त्यांनी ट्वीट केलं की, “ते अमेरिकेत फ्री स्पीचचा तिरस्कार करतात का?”

ट्विटर विकत घेतल्यापासून मस्क चर्चेत 

एलॉन मस्क यांनी अलिकडेच ट्विटर कंपनी विकत घेतली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मस्क आणि ट्विटर यांच्यातील ही डील चर्चेत होती. मस्क यांनी 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटर कंपनी विकत घेतली. तेव्हापासून मस्क यांनी ट्विटर कंपनीत अनेक बदल केले आहेत. ट्विटरमधून अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं. ट्विटरने पेड ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा सुरु करण्याचाही निर्णय घेतला. शिवाय अलिकडेच ट्विटर अकाऊंट तीन रंगात व्हेरिफाईड होणार असल्याची माहिती मस्क यांनी दिली आहे. यापुढे ट्विटर अकाऊंट निळा, सोनेरी, राखाडी रंगांच्या व्हेरिफाईड टिक ट्वीटर अकाऊंटला देण्यात येणार असल्याचं मस्क यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Elon Musk : एलॉन मस्कच्या ट्वीटला युपी पोलिसांचं भन्नाट उत्तर, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल[ad_2]

Source link

Leave a Comment