Twitter Verification: एलॉन मस्क (Elon Musk ) यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून अनेक बदल केले आहेत. ट्विटर अकाऊंट तीन रंगात व्हेरिफाईड होणार असल्याची माहिती एलॉन मस्क यांनी दिली आहे. यापुढे निळी, सोनेरी, राखाडी टिक व्हेरिफाईड ट्वीटर खात्याला मिळणार आहे. पुढील शुक्रवारपासून म्हणजेच 2 डिसेंबरपासून व्हेरिफाईड ट्वीटर खात्यासाठी निळ्या रंगासह सोनेरी आणि राखाडी रंगाचा मार्क येणार आहे. यामध्ये कंपन्यांसाठी सोनेरी, सरकार आणि सरकारी संस्थांसाठी राखाडी मार्क असणार आहे तर इतरांसाठी निळ्या रंगाची टिक मिळणार आहे. मस्क यांनी यासंदर्भात एक ट्विट करत माहिती दिली आहे.
Twitter चे मालक आणि जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk ) यांनी ट्वीटरवर एका व्यक्तीला रिप्लाय देताना व्हेरिफाईड खात्यासाठी लवकरच बदल करण्यात येणार आहे. व्हेरिफाईड खात्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या टिक असतील अशी माहिती दिली आहे. पुढील शुक्रवारपासून या सुविधेला सुरुवात होणार आहे. यामध्ये निळ्या रंगाच्या टिकशिवाय सोनेरी आणि राखाडी रंगाची टिक येणार आहे. कंपन्यांसाठी सोनेरी, सरकार आणि सरकारी संस्थांसाठी राखाडी मार्क असणार आहे तर इतरांसाठी निळ्या रंगाची टिक मिळणार आहे.
Sorry for the delay, we’re tentatively launching Verified on Friday next week.
News Reels
Gold check for companies, grey check for government, blue for individuals (celebrity or not) and all verified accounts will be manually authenticated before check activates.
Painful, but necessary.
— Elon Musk (@elonmusk) November 25, 2022
बॅन अकाऊंटवरील बंदी हटवणार, एलॉन मस्क यांची घोषणा
एलॉन मस्क यांनी बॅन अकाऊंटबाबत ( Twitter Ban Accounts ) मोठा निर्णय घेतलाय. मस्क यांनी ट्विटरवरील बॅन अकाऊंटवरील बंदी (Twitter Suspended Accounts) हटवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटर पोलवरून मस्क यांनी हा निर्णय घेतला आहे. मस्क यांनी ट्विटरवर पोल घेत युजर्सला विचारलं होतं की, बॅन अकाऊंटवरील बंदी हटवावी की नाही. या पोलला 70 टक्के युजर्सने हो असं उत्तर दिलं आहे. त्यानंतर मस्क यांनी बॅन अकाऊंटवरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मस्क यांनी यासंदर्भात एक ट्विट करत माहिती दिली आहे. मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘जनतेने आपला कौल दिला आहे. पुढील आठवड्यापासून ‘माफी’ला सुरूवात होईल.’ याचा अर्थ पुढील आठवड्यापासून गंभीर चूक किंवा कायदा न मोडणाऱ्या ट्विटवर अकाऊंटवरील बंदी हटवण्यास येणार आहे.
आठ डॉलरच्या ब्लू टिक व्हेरिफिकेशनचं री-लाँचिंग थांबवलं
ब्लू टिक सबस्क्रिप्शन लाँच करण्याचा निर्णय तूर्तास थांबवण्यात आल्याचं मस्क यांनी ट्वीट करत सांगितलं होतं. बनावट अकाऊंटला पूर्णपणे आळा बसवण्यासाठी योग्य मार्ग सापडेपर्यंत ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा लाँच करणं थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मस्क यांनी ट्वीट करत सांगितलं.
ही बातमी वाचायला विसरु नका: