Elon Musk And Twitter Deal Tesla Ceo Elon Musk At Twitter Headquarters With Sink Video Getting Viral Marathi News


Elon Musk and Twitter Deal : गेल्या अनेक दिवसांपासून एलन मस्क ट्विटर डिलमुळे (Twitter Deal) चर्चेत आहे. पण अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर तो क्षण आला. जेव्हा एलन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरच्या कार्यालयात (Twitter Office) पाऊल ठेवलं. न्यायालयानं शुक्रवारपर्यंत 44 बिलियन डॉलर्सची ही डील पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. या मुदतीच्या दोन दिवस आधीच एलन मस्क यांनी आपल्या ट्विटर बायोमध्येही काही बदल केले आहेत. मस्क यांनी ट्विटर प्रोफाइलमध्ये लोकेशन ‘ट्विटर हेडक्वॉर्टर’ असं अपडेट केलं. त्यापाठोपाठच त्यांनी डिसक्रिप्टर ‘चीफ ट्वीट’ असं लिहिलं. त्यानंतर एलन मस्क यांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील ट्विटरच्या मुख्यालयात पोहोचले. मस्क ट्विटरच्या कार्यालयात गेले खरे, पण ते रिकाम्या हातांनी नाही, तर एक बेसीन सिंक घेऊन पोहोचले. 

सोशल मीडियावर व्हायरल होतंय ट्वीट  

एलन मस्क यांनी ट्विटर हेडक्वॉर्टर्समध्ये एन्ट्री घेतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मस्क यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एलन मस्क यांनी जो व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यामध्ये ते ट्विटर हेड क्वॉर्टर्समध्ये एक बेसीन सिंक घेऊन जाताना दिसत आहेत. मस्क स्वतः बेसीन सिंक उचलून ट्विटर ऑफिसमध्ये प्रवेश घेत आहेत. या व्हिडीओला त्यांनी एक कॅप्शनही दिलं आहे. ‘Entering Twitter HQ – let that sink in!’, असं कॅप्शन त्यांनी व्हिडीओ ट्वीट करताना दिलं आहे. 

एक दिवसापूर्वी बँकर्सची बैठक 

ट्विटर ऑफिसमध्ये पोहोचण्याच्या एक दिवस आधी एलन मस्क यांनी मंगळवारी या डीलसंदर्भात निधी उपलब्ध करून देणाऱ्या बँकर्ससोबत बैठक घेतली होती. ब्लूमबर्गनं दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी ट्विटरच्या चीफ मार्केटिंग ऑफिसरनी कर्मचाऱ्यांना एक मेमो पाठवून माहिती दिली की,  “मस्क स्टाफला संबोधित करण्यासाठी या आठवड्यात सॅन फ्रांसिस्को मुख्यालयाचा दौरा करतील. शुक्रवारी कर्मचारी त्यांच्याशी थेट संवाद साधू शकतील. दरम्यान, डेलावेअर चॅन्सरी कोर्टाचे न्यायाधीश कॅथलीन मॅककॉर्मिक यांनी मस्क यांना हा करार पूर्ण करण्याचे आणि शुक्रवार, 28 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत डील पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. 

कर्मचाऱ्यांनी लिहिलं खुलं पत्र 

दरम्यान, ट्विटरच्या कर्मचाऱ्यांनी या आठवड्यात एक खुलं पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी करार पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या दोन तृतीयांश कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या एलन मस्कच्या कथित योजनेला विरोध केला होता. Source link

Leave a Comment