Elon Musk यांचा कर्मचाऱ्यांना झटका, पहिल्या टप्प्यात २ हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार<p>ट्विटरच्या कर्मचाऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी… आजपासून ट्विटरमध्ये कर्मचारी कपात सुरु होणार आहे… मेसेजिंग प्लॅटफॉर्म फायदेशीर करण्यासाठी एलन मस्क यांनी हा निर्णय घेतलाय.. कपातीसंदर्भात कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे माहिती देण्यात आलीय… कंपनीच्या हिताकरीता हे दुर्दैवी पाऊल उचलावे लागत असल्याचं या ईमेलमध्ये नमूद करण्यात आलंय.. ट्विटरची एकूण कर्मचारी संख्या साडे सात हजारांहून अधिक असून पहिल्या टप्प्यात २ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे… ट्विटर कर्मचाऱ्यांसाठी असलेले वर्क फ्रॉम एनिवेअर पॉलिसीतही बदल केले जाणार असल्याचं समजतंय.. कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येत काम करण्याच्या सूचना मिळण्याचीही शक्यता आहे..</p>Source link

Leave a Comment