Donald Trump Account Reappears On Twitter After Elon Musk Reinstatement Marathi News


Trump account reappears on Twitter : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या प्रक्षोभक ट्विटमुळे जानेवारी 2021 मध्ये ट्विटरवर (Twitter) बंदी घालण्यात आली होती. मात्र एलॉन मस्क (Elon Musk) ट्विटरचे नवे मालक झाल्यापासून ट्विटरमध्ये नवे बदल होताना दिसत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटरवरील अकाऊंट पुनर्संचयित म्हणजेच रिस्टोअर करण्यात येणार की नाही? याबद्दल चर्चा होती. यानंतर मस्कने एक सर्वेक्षण देखील सुरू केले होते, ज्यामध्ये ते ट्विटर यूजर्स विचारत होते की, ट्रम्प यांचे अकाऊंट पुन्हा सुरू करावे की नाही? मात्र एएफपीच्या वृत्तानुसार ट्विटरवर ट्रम्प यांचे अकाऊंट पुन्हा दिसून आले आहे.

 

Reels

 

ट्विटरवर परतण्यात ट्रम्पना रस नाही?

ट्विटरचे नवीन मालक एलॉन मस्क यांनी जबाबदारी स्वीकारताच, या प्लॅटफॉर्मवर अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते पुनर्संचयित करण्याबद्दल चर्चा सुरू झाली. त्यासाठी त्यांनी शनिवारपासून मतदानालाही सुरुवात केली. रविवारी मतदान संपल्यानंतर ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट पुन्हा दिसले, मात्र बहुमतानंतरही आता ट्विटरवर परतण्यात रस नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी स्पष्ट केले.

 

 

 

‘लोकांचा आवाज हा देवाचा आवाज’

मस्क यांनी यापूर्वी 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:17 वाजता डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटरवरील अकाऊंट सुरू व्हावे की नाही? यासाठी लोकांकडून मत मागितले होते. ज्यानंतर मतदानाला सुरुवात करण्यात आली. त्यांच्या सर्वेक्षणाला आता 2 लाख 75 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या सर्वेक्षणाला एक लाख 7 हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे. हा पोल घेण्यामागील कारण स्पष्ट करताना एलॉन मस्क यांनी ‘वोक्स पॉप्युली, वोक्स देई’ हा लोकप्रिय लॅटिन वाक्प्रचार वापरला आहे, ज्याचा ‘लोकांचा आवाज हा देवाचा आवाज आहे’ असा याचा अर्थ होतो. 

ट्रम्प यांचे स्वतःचे सोशल मीडीया प्लॅटफॉर्म

ट्विटरवर ट्रम्प यांचे अकाऊंट निलंबित झाल्यानंतर ट्रम्प यांनी फेब्रुवारीमध्ये स्वतःचे सोशल मीडीया प्लॅटफॉर्म सुरू केले. त्याला ट्रुथ सोशल असे नाव दिले. ट्रुथ सोशलवर ट्रम्प यांचे सुमारे 45.7 फॉलोअर्स आहेत. ट्रुथ सोशलवर ट्रम्प सतत सक्रिय असतात. हे अॅप पूर्वी अॅप स्टोअरवर उपलब्ध होते, हळूहळू ते या वर्षी ऑक्टोबरमध्ये Google Play Store वर देखील सूचीबद्ध झाले.

ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट गेल्या वर्षी निलंबित 
अमेरिकेच्या निवडणूक निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कॅपिटल हिलमध्ये दंगल भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांनंतर ट्विटरने जानेवारी 2021 मध्ये ट्रम्प यांचे खाते निलंबित केले होते. आता, मस्क यांच्याकडून हे अकाऊंट सक्रिय करण्यासाठी मतदान सुरू करण्याच्या आधीच सुमारे 14.8 दशलक्ष ट्विटर यूजर्सनी म्हणजेच 51.8% ने ट्रम्पचे खाते पुन्हा सक्रिय करण्याच्या बाजूने मतदान केले होते. 

 

 

 





Source link

Leave a Comment