Cyber Crime Tips :सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी? काय सांगतात सायबर एक्सपर्ट रोहन न्यायाधीश?
Cyber Crime Tips :  देशात सायबर गुन्ह्याचं (cyber crime) प्रमाण झपाट्याने वाढत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि लोन अॅपच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीमुळे (Crime) अनेक लोक टोकाचं पाऊल उचलतानाचं चित्र आहे. मात्र सोशल मीडिया वापरत असतात अशा प्रकारे फसवणूक (fraud) होऊ नये, यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे.

अनेक तरुण किंवा सोशल मीडिया वापरणारे आपली खासगी माहिती सर्रासपणे सोशल मीडियावर शेअर करतात. कोणतंही अॅप डाऊनलोड केल्यावर अनेक परवानग्या मागितल्या जातात. त्या परवानग्या आपण सर्रासपणे देऊन टाकतो. याचा वापर सोशल मीडियावरुन गुन्हे करु पाहणारे भामटे करतात. त्यामुळे आपण आपली किती माहिती सोशल मीडियावर शेअर करायची हे ठरवायला हवं, असं सायबर एक्सपर्ट रोहन न्यायाधीश सांगतात. Investigation Manual for Cyber Crime & Cyber Laws त्यांच्या या पुस्तकात सायबर क्राईम विषयी माहिती दिली आहे आणि खालील सोप्या टिप्स सांगितल्या आहेत.

सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी?

-सोशल मीडियासाठी Two Way Authentication चा वापर करा.
-पर्सनल मोबाइल नंबर आणि पब्लिक मोबाइल नंबर वेगळा ठेवा.
-कोणत्या ही लिंक वर क्लिक करू नका.
-टोपणनावाचा वापर करा. यूझरनेम म्हणून स्वतःचे खरे नाव वापरू नका.
-आपल्या ऑनलाइन प्रोफाइलमध्ये वैयक्तिक माहिती देऊ नका.
-प्रोफाइल सेट करताना सर्वात मजबूत प्रायव्हसी सेटिंग वापरा. यामुळे फक्त तुमचे मित्र तुमची माहिती पाहू शकतील.
-ऑनलाइन चॅटिंगचे नियम स्वतःच ठरवा. चॅट वापरण्याचा कालावधी स्वतःच ठरवून तो पाळण्याचा प्रयत्न करा.
-सार्वजनिक ठिकाणी असलेलं वायफाय/ इंटरनेट वापरू नका.

आपणास धमकी दिली गेल्यास
-घाबरू नका, शांत रहा, चॅट थांबवा व लॉगऑफ करा किंवा चॅटरूमच्या बाहेर पडा.
-नाही म्हणण्यास घाबरू नका आरोपींनी सांगितलेल्या गोष्टी करण्याची आपली तयारी नसल्यास त्यांना न घाबरता तसे सांगा.
-आपणांस कोणी धमकावल्यास किंवा त्रास दिल्यास पालकांना लगेचच त्याबद्दल सांगा.
-आपल्या संवादाचा स्क्रीनशॉट घ्या आणि तो पुरावा म्हणून पोलिसांना दाखवला जाईल असे धमकवणाऱ्याला सांगा
-कोणी आपल्याशी असभ्य भाषेत संवाद केल्यास किंवा धमकावल्यास त्या संवादाचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, तो नंतर गरज पडल्यास पुरावा म्हणून वापरता येईल.
-लगेच लॉगऑफ करू नका, कोणी आपल्याशी असभ्य भाषेत संवाद केल्यास किंवा धमकावल्यास लगेचच लॉगऑफ करू नका, पालकांना, सायबर एक्स्पर्ट यांच्याशी चर्चा करा.
Source link

Leave a Comment