Cococola Smartphone Teaser Video Out Brand Has Collab With Realme India Marathi News


Coco-cola Smartphone : तुमच्यापैकी अनेकांनी Coco-cola प्यायला असेल. पण Coco-cola स्मार्टफोनबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का? नसेल केला तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. लवकरच Coco-col  ब्रँड आपला नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. यासाठी Coco-cola कंपनीने Real Me बरोबर भागिदारी केली आहे. नुकताच याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. तसेच कंपनीच्या सीईओनेही ट्विट केले आहे. नवीन स्मार्टफोनमध्ये नेमके कोणते फिचर्स असतील याबाबत अद्यापल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, Realme 4G सारखेच याचे फिचर्स असू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. म्हणजेच नवीन स्मार्टफोनमध्ये Realme 10 4G सारखे स्पेसिफिकेशन्स मिळू शकतात. 

Coca-Cola phone ची माहिती टिपस्टर मुकुल शर्मा यांच्याकडून देण्यात आली आहे. फोनचा फोटो शेअर करण्याबरोबरच मुकुलने म्हटले की, हा मोबाईल मार्च महिन्याआधी भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. या फोन द्वारे कोका कोला स्मार्टफोन ब्रँड रियलमी सोबत पार्टनरशीप करण्याची शक्यता आहे. चर्चा अशीही आहे की, हा फोन Realme 10 4G फोनचा रिब्रँडेड व्हर्जन म्हणून समोर येऊ शकतो. 

 

Realme 10 4G चे फिचर्स 

Realme 10 मध्ये 6.5-inch FHD+ AMOLED डिसप्ले दिला आहे. जो 90Hz refresh rate सपोर्ट सोबत येतो. तर फोनच्या फ्रंटवर पंच होल कटआउट आणि नॅरो बेजल्स दिले आहेत. याशिवाय, फोनमध्ये पॉवर देण्यासाठी MediaTek Helio G99 SoC दिले आहे. या प्रोसेसर सोबत 8 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे. हा फोन अँड्रॉयड 13 आधारित Realme UI कस्टम स्किन आउट ऑफ द बॉक्स वर रन करतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा दिला आहे. फ्रंट वर 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये पॉवर बॅकअप देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी आणि 33W SuperVOOC fast charging सपोर्ट दिला आहे.

Coco cola चा स्मार्टफोन कधी लाँच होणार?

कोका-कोला मार्चच्या पहिल्या आठवड्यात आपला नवीन स्मार्टफोन बाजारात आणू शकतो. Realme India च्या CEO ने देखील एक फोटो शेअर केला आहे जो हे स्पष्ट करतो की Coco cola ने Realme सोबत सहयोग केला आहे आणि फोन Realme 10 4G किंवा 5G असण्याची शक्यता आहे. 

‘हे’ स्मार्टफोन लवकरच लॉन्च केले जातील

काही दिवसांनंतर, कोरियन कंपनी सॅमसंग आपल्या S23 सीरीजचे अनावरण करणार आहे. सॅमसंगनंतर 7 फेब्रुवारीला वनप्लस आपले दोन नवीन स्मार्टफोन आणि इतर अनेक गॅजेट्स बाजारात सादर करणार आहे. याशिवाय IQOO Neo 7 5G देखील फेब्रुवारीमध्ये सादर केला जाऊ शकतो. फोनमध्ये 12 GB पर्यंत रॅमचा पर्याय मिळू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या : 

‘या’ दिवशी लॉन्च होईल OnePlus Pad, मिळणार जबरदस्त फीचर्स

Source link

Leave a Comment