Chinese Internet Of Things Allow Surveillance Of Cities, Becomes Threat To The World Report


China Surveillance on Cities : ‘ड्रॅगन’ अर्थात चीनकडून नवीन शस्त्र (Weapon) आणि तंत्रज्ञानाचा (Technology) शोध लावून जगाला आपली ताकद दाखवण्याचे काम सातत्याने सुरू असते. आता चीनच्या नव्या शस्त्राने जगाची चिंता वाढवली आहे. चीनचा हा नवीन शोध संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चीनचे इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT) येत्या काळात संपूर्ण जगासाठी मोठा धोका ठरण्याची शक्यता आहे. एका रिपोर्टनुसार, चीनने हेरगिरी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे. हे तंत्रज्ञान जगासाठी अत्यंत धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. 

चीनकडून आता हेरगिरीसाठी नवं तंत्रज्ञान?

पोर्टल प्लसच्या रिपोर्टनुसार, चीनकडून आता हेरगिरीसाठी इंटरनेट नेटवर्कचा वापर करण्यात येणार आहे. चीनने इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) नावाचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) म्हणजे असे नेटवर्क, जे इंटरनेटवर इतर डिव्हाइसेस आणि सिस्टमशी कनेक्ट आणि डेटाची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने सॉफ्टवेअर, सेन्सर्स आणि इतर तंत्रज्ञानासह जोडलेले असेल.

चीनचं नवं तंत्रज्ञान जगासाठी मोठा धोका

तज्ज्ञांच्या मते, हॅकर्स या नेटवर्कचा वापर करून सहज कोणताही डेटा चोरू शकतील. पोर्टल प्लसच्या अहवालानुसार, राष्ट्रीय सुरक्षा आणि महत्त्वाच्या उद्योगांमध्ये चीनचे हे नवीन शस्त्र स्मार्ट शहरांमध्येही हेरगिरीचे साधन बनू शकते. एवढंच नाही तर याचा वापर हॅकर्स चुकूच्या कामांसाठी करू शकतात. यामुळे चीनचे हे तंत्रज्ञान जगासाठी मोठा धोका निर्माण करू शकते.

इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे काय?

इंटरनेट ऑफ थिंग्ज हे तंत्रज्ञान आहे. यामध्ये नेटवर्किंगद्वारे अनेक गॅझेट्स एकमेकांशी जोडले जातील. इंटरनेट ऑफ थिंग्जला IOT असंही म्हणतात. यामध्ये, सर्व गॅजेट्स एकमेकांशी कनेक्ट होतात आणि डेटाची देवाणघेवाण करतात, ज्यामुळे सर्व उपकरणांमधील डेटा एकत्र होतो.

इंटरनेट ऑफ थिंग्जमुळे धोका वाढेल?

इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये जगभरात स्मार्ट शहरे जोडली जाऊ शकताली. यामध्ये सर्व उपकरणे एकमेकांशी जोडलेली जातील. पण याचा गैरवापर देखील होण्याची शक्यता आहे. समजा तुम्ही इंटेलिजन्स लॅबमध्ये दरवाजा आणि कॅमेरे बंद ठेवून गेलात. या लॅबमध्ये सर्व काही AI सिस्टिमवर आधारीत आहे. पण जर तुम्ही इंटरनेट ऑफ थिंग्जच्या माध्यमातून जोडले गेलात, तर तुमच्या लॅबच्या AI सिस्टिमचा डेटाचा अॅक्सेस इंटरनेट ऑफ थिंग्जला (IOT) मिळेल आणि IOT ला त्यावर नियंत्रण ठेवता येईल. यामुळे हॅकर्सला ही तुमच्या लॅबमधील सिस्टिम आणि कॅमेरा हॅक करण्यासाठी सहज संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

लॅबची AI सिस्टिम दरवाजे आणि कॅमेरे नियंत्रित करू शकते तसेच इतर डेटा सुरक्षित ठेवण्याचे काम करेल. पण जर, इंटरनेट ऑफ थिंग्जमुळे (IOT) या लॅबचं नेटवर्क चीनच्या नेटवर्कशी कोणत्याही प्रकारे जोडले गेल्यास ते हेरगिरीचे साधनही बनू शकते. त्यामुळे संपूर्ण जगासाठी हा मोठा धोका ठरेल.Source link

Leave a Comment