ChatGPT Which Gives More Accurate Answer Than Google Know What Is This Chatbot Marathi News


मुंबई: OpenAI या AI कंपनीने ChatGPT, कंपनीच्या नवीन GPT-3.5 नैसर्गिक भाषा निर्मिती तंत्रज्ञानावर आधारित चॅटबॉटची घोषणा केली आणि ते 30 नोव्हेंबरला रिलीज केलं. GPT म्हणजे Generative Pre-trained Transformer.  आठवड्याभरात 1 मिलियनहून अधिक युजर्स असणाऱ्या चॅटजीपीटी या प्रणालीत आपल्याला संवादात्मक पद्धतीने इंटरनेटवरील माहिती मिळवणे सोपे होणार.

ट्विटरचे सीईओ ईलॉन मस्क आणि ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमॅन यांनी एकत्र या कंपनीची स्थापना केली होती. काही अंशी मायक्रोसॉफ्टचीसुद्धा यात गुंतवणूक आहे. ओपनएआयने (OpenAI) ने यापूर्वी DALL-E (डॅल-ई) सादर केले होते, हे एक AI इमेज जनरेटर आहे जो तुम्हाला पाहिजे तशी इमेज तयार करून देतो.

चॅटजीपीटी ही अगदी गूगलची सुधारित आवृत्ती असल्याचेही अनेकांनी म्हटले आहे. पण हे गुगलच्या पुढे जाऊन इंटरनेटवर उपलब्ध असलेला मजकूर आणि साहित्य वाचून आणि मुख्य म्हणजे तो मजकूर समजून घेऊन तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतं, तेही अगदी एखाद्या विचारवंतासारखं. 

चॅटजीपीटीचा सर्वात उत्तम फायदा म्हणजे तुम्ही आधीच्या प्रश्नाच्या उत्तरावरसुद्धा आधारित प्रश्न करू शकता. हे बॉट तुम्ही भूतकाळात विचारलेले प्रश्न लक्षात ठेवतं आणि जर तुम्ही एखादी त्याने एखादी केलेली चूक दाखवली तर त्यामध्ये स्वतः सुधार करतं. माणूस कल्पनेच्या जोरावर ज्या क्रिएटिव्ह गोष्टी करतो तेसुद्धा हा बॉट करतो. 

News Reels

डीप लर्निंग ही एक मशीन लर्निंग पद्धत आहे ज्यामध्ये न्यूरल नेटवर्कचे तीन किंवा अधिक स्तर असतात. हे नेटवर्क मानवी मेंदूप्रमाणे विचार करण्याचा प्रयत्न करतं आणि डेटा वापरून आपल्याप्रमाणे शिकतं. अशावेळी चॅटजीपीटी हे एखाद्या शिक्षकाप्रमाणे तुमचा प्रश्न समजून केवळ माहितीच नव्हे तर उदाहरणासह उत्तर देऊ शकते. 

तुम्हाला इंटरेटवरील हजारो लेख वाचून त्यातून हवं असणारं अचूक उत्तर ही प्रणाली देऊ शकते. चॅट जीपीटी ही माहिती निर्माण करण्यास सक्षम आहे. हे उत्तर पॅराग्राफ, लेख, कविता, कथा कोणत्याही स्वरूपात असू शकतं. सर्व तंत्रज्ञानाप्रमाणेच चॅटजीपीटीलासुद्धा मर्यादा आहेत. ChatGPT विस्तृत आणि नेमकी माहिती देऊ शकत असले तरीही या माहितीची सत्यता 100 टक्के योग्य असेल याची खात्री नाही.

ChatGPTचा वापर शिक्षण, कला,कायदा वगैरे क्षेत्रात तर होऊच शकतो, पण त्याचबरोबर कोडिंगच्या आणि मीडिया क्षेत्रात याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.OpenAI हे अजून बिटा मोडवर आहे त्यामुळे येणाऱ्या काळात यात मोठे बदल अपेक्षित आहेत. 

या ॲपमुळे मनुष्याची विचार करण्याची क्षमता कमी होत जाणार नाही का? माझी नोकरी जाणार का? लाखो लोक एका झटक्यात बेकार होतील का? यंत्र आता पटकथा आणि कविता लिहू लागल्यावर लेखक-कवींच्या पोटावर पाय येऊ शकतो? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्तानं इंटरनेटवर उपस्थित होत आहेत. 

 Source link

Leave a Comment