ChatGPT Interviewed Bill Gates And Rishi Sunak Asked These Questions


ChatGPT Interviewe Bill gates and Rishi Sunak: आतापर्यंत तुम्ही ओपन एआयच्या चॅटबॉट ‘ChatGPT’बद्दल अनेक बातम्या ऐकल्या आणि वाचल्या असतील. आज आम्ही तुम्हाला याशीच संबंधित एक वेगळी बातमी सांगणार आहोत. या चॅटबॉटने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत चॅटबॉटने दोघांना आश्चर्यकारक प्रश्न विचारले, ज्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान जे आता अधिक पुढे आलं आहे.  

ChatGPT Interviewed Bill gates and Rishi Sunak: चॅटबॉटने दोघांना विचारले ‘हे’ प्रश्न 

चॅटबॉटने बिल गेट्स यांना विचारलेला पहिला प्रश्न असा होता की, जागतिक अर्थव्यवस्थेवर तंत्रज्ञानाचा काय परिणाम होईल आणि येत्या 10 वर्षात नोकरीची बाजारपेठ कशी असेल? याला प्रत्युत्तर देताना बिल गेट्स म्हणाले की, आपण सर्वांनी अधिक कार्यक्षम असण्याची गरज आहे. कारण अजूनही अनेक छोट्या देशांमध्ये कामगारांची कमतरता आहे. विशेषत: आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात अशा लोकांची कमतरता आहे. ज्यावर आपण काम केले पाहिजे. ही क्षेत्रे मजबूत झाल्यामुळे अर्थव्यवस्थेतही सुधारणा होईल. यासोबतच बिल गेट्स म्हणाले की, AI सारखे तंत्रज्ञान हे काम पूर्ण करण्यासाठी खूप मदत करू शकते.

चॅट GPT ने त्या दोघांना विचारला की, तुम्ही स्वतःला काय सल्ला द्याल? जेव्हा तुमचं वय आजपेक्षा 10 वर्ष कमी होतं…

बिल गेट्स आणि ऋषी सुनक यांनी या प्रश्नाचे समान उत्तर दिले आणि सांगितले की, ते काम करण्याऐवजी गोष्टींचा आनंद घेतात. सतत काम करण्याऐवजी सध्याच्या क्षणात जगणे पसंत करतात. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी सांगितले की, त्यांचा वीकेंड इत्यादींवर विश्वास नव्हता आणि ते काम करत राहिले, जे त्यांना आता योग्य वाटत नाही. ऋषी सुनक यांनीही असेच उत्तर दिले. ते म्हणाले की, ते एका स्थलांतरित कुटुंबातून आले आहेत. जिथे सतत कामाचे वातावरण होते. एक काम संपलं की दुसरं सुरू होतं आणि आयुष्यात पुढे जाण्याचा संघर्ष सुरू झाला. आहे तो वेळ एन्जॉय करून वर्तमान क्षण मोकळेपणाने जगता आलं असता, तर बरं झालं असतं.

तिसरा प्रश्न- एआय टूल वापरून तुम्हाला तुमचे कोणते काय करायला आवडेल?

या प्रश्नाला उत्तर देताना बिल गेट्स म्हणाले की, नोट्स लिहिण्यासाठी त्यांना कधीही एआय टूल्स मिळतील. पत्र वगैरे उत्तम लिहण्यासाठी त्यांनी याची मदत घेतली असती. सोबतच कविता, गाणी वगैरे लिहिण्यासाठीही याची मदत घेतली असती. तर ऋषी सुनक म्हणाले की, त्यांनी या एआय टूलद्वारे त्यांच्या साप्ताहिक प्रश्नांची वेळ मॅनेज केली असती. त्यांना सतत लोकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. एआय टूलने या प्रश्नांची उत्तरे दिली असती, तर बरे झाले असते मी मोकळा झालो असतो.

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी त्यांच्या लिंक्डइन अकाउंटवर मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याची लिंक आम्ही येथे दिली आहे. ( https://www.linkedin.com/posts/williamhgates_rishi-sunak-and-i-were-interviewed-by-an-activity-7032372557647400960-0u6B?utm_source=share&utm_medium=member_android )

 

 Source link

Leave a Comment