BSNL To Start 5G Services In 2024 Ashwini Vaishnav Telecom Minister Latest Marathi News


BSNL 5G Latest Updates: सरकारी टेलिकॉम कंपनी ‘भारत संचार निगम लिमिटेड’ (BSNL) देखील आपली 5G सेवा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय आयटी आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएल 5जी सेवा सुरु करणार अशा बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या याची अखेर पुष्टी झाली आहे. त्यामुळे एअरटेल आणि जिओनंतर आता बीएसएनलदेखील 5जीच्या स्पर्धेत उतरणार आहे.

एप्रिल 2024 पर्यंत 5G सेवा सुरू करणार

सरकारने जारी केलेल्या अहवालानुसार अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली आहे की बीएसएनएल एप्रिल 2024 पर्यंत त्यांची 5G सेवा सुरू करेल. सध्या कंपनी 4G लॉन्च वर लक्ष केंद्रित करत आहे. बीएसएनल 4G नेटवर्क लाँच झाल्यानंतर एका वर्षाच्या आत कंपनी 5G वर अपग्रेड केले जाईल.

4G नेटवर्क सुरू करण्यावर काम 

सध्या  बीएसएनल  4G नेटवर्क सुरू करण्यासाठी TCS आणि C-DOT सोबत काम करत आहे. अश्विनी वैष्णव यांच्या मते   बीएसएनल  5G मार्च किंवा एप्रिल 2024 पासून उपलब्ध होईल. नेटवर्क अपग्रेडेशनचे काम वेगाने सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.  बीएसएनल वेगाने 4G सेवा आणणार आहे आणि 5G च्या बाबतीतही असेच होईल. अश्विनी वैष्णव यांनी ओडिशात एअरटेल आणि जिओ 5G सेवा सुरू करताना या गोष्टी सांगितल्या आहेत. 

पुढील 2 वर्षांत बीएसएनएल 5जी सेवा ओडिशामध्ये उपलब्ध करून दिली जाईल, असा दावाही त्यांनी केला. यापूर्वी 26 जानेवारीपासून राज्यात 5जी सेवा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

live reels News Reels

बीएसएनएलची एअरटेल आणि जिओला टक्कर 

बीएसएनल 5G सेवा सुरू झाल्यानंतर एअरटेल आणि जिओ यांच्यात स्पर्धा होईल. एअरटेल आणि जिओने ऑक्टोबरमध्ये भारतात 5G सेवा सुरू केली होती. तेव्हापासून आतापर्यंत एअरटेल आणि जिओ या दोन्ही कंपन्यांनी अनेक शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. 5G सेवा वापरण्यासाठी, तुमच्याकडे पात्र स्मार्टफोन आणि दूरसंचार योजना असणे आवश्यक आहे. मात्र यासाठी तुम्हाला कोणताही 5G प्लान घेण्याची गरज नाही.

ही बातमी देखील वाचा

UPSC क्रॅक करायचीय? तर ‘या’ तीन गोष्टी अत्यावश्यक; पुणे, दिल्लीला न जाता गावात राहून परीक्षा पास झालेल्या IPS अजिंक्य मानेंचा मूलमंत्र



Source link

Leave a Comment