Ban On ChatGPT In India Too By School Of Computer Science And Engineering Bengluru


ChatGPT:  एकीकडे ओपन एआयचा चॅटबॉट भविष्यासाठी चांगला मानला जात आहे. तर दुसरीकडे तो मुलांसाठी धोकादायक असल्याचेही बोलले जात आहे. याचे कारण म्हणजे, हे मुलांची क्रिएटिव्ह थिंकिंग आणि समस्या सोडवण्याची क्षमता कमी करते. एआय टूल्सच्या मदतीने मुले त्यांचे गृहपाठ, असाइनमेंट आणि प्रयोगशाळेतील टेस्ट सहज करते. इतकंच नाही तर या चॅटबॉटन एमबीए आणि लॉच्या परीक्षा देखील उत्तीर्ण केल्या आहेत. 

जगभरातील विद्यापीठातील शिक्षक आणि प्राध्यापकांनी या चॅटबॉटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. काही काळापूर्वी अमेरिकेतील एका विद्यापीठाने यावर बंदी घातल्याची बातमी समोर आली होती. आता भारतातूनही अशीच बातमी समोर आली आहे. बंगळुरूमधील एका विद्यापीठाने हा चॅटबॉट विद्यापीठाच्या आत ब्लॉक केला आहे.

या विद्यापीठाने केले ब्लॉक 

बेंगळुरू येथील स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंगचे  डीन संजय चिटणीस यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी एक Advisory  जारी केली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, विद्यापीठात चॅट जीपीटी वापरणे प्रतिबंधित आहे. कोणीही असे करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. युनिव्हर्सिटीमध्ये मुलांचे असाइनमेंटही तपासले जात आहेत, तसेच त्यांना त्यांच्यासमोर लिहायला सांगितले जात आहे. जेणेकरून त्यांनी एआयच्या मदतीने लॅब टेस्ट, असाइनमेंट वगैरे केले आहेत की नाही, हे कळू शकेल. टेस्टमध्ये काही फरक आढळल्यास किंवा मुलाने एआयच्या मदतीने काम केल्याचे समोर आले, तर कारवाई केली जात आहे.

ChatGPT: नोकरी करणारे लोक चॅटबॉट्सला घाबरतात

ओपन एआयच्या या चॅटबॉटने जगभरात खळबळ माजवली आहे. हा चॅटबॉट मशीन लर्निंगवर आधारित एक एआय टूल आहे. ज्यामध्ये सर्व सार्वजनिकपणे उपलब्ध डेटा फीड केला गेला आहे. हा चॅटबॉट कोणत्याही प्रश्नाचे उत्तर गुगलपेक्षा चांगले देऊ शकतो. याची क्षमता जाणून घेण्यासाठी लोकांनी त्याला एमबीए, लॉ इत्यादी अनेक परीक्षा देण्यास भाग पाडले आहे. हा चॅटबॉट इतका सक्षम आहे की, काही क्षणात देऊ शकतो. मात्र हा चॅटबॉट मुलांच्या भवितव्यासाठी चांगला नाही, असे बोलले जात आहे. तसेच नोकरी करणारे लोक देखील याला घाबरून आहेत, कारण हे काही सेकंदातच काम करते. यामुळे त्यांच्या नोकरीला धोका निर्माण होऊ शकतो. दरम्यान, चॅटबॉट तयार करणारी कंपनी 2015 मध्ये इलॉन मस्क आणि सॅम ऑल्टमने यांनी सुरू केली होती. मात्र नंतर मस्क या प्रकल्पापासून वेगळे झाले. सध्या ओपन एआय मायक्रोसॉफ्टद्वारे समर्थित आहे.Source link

Leave a Comment