Apple Will Be Enabling 5G In The IOS 16 Beta Software Program In Week Of 7th November 2022 Tech Marathi News


5G On APPLE iPhone In India : Apple iPhone यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी पुढील आठवड्यात iOS बीटा प्रोग्राम सुरू करणार आहे. ज्यामुळे भारतीय यूजर्ससाठी 5G सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बीटा चाचणी दरम्यान, यूजर्स स्पीड टेस्ट करू शकतील. यासोबतच यूजर्सना फीडबॅक देण्याची सुविधाही मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Apple पुढील आठवड्यापासून म्हणजेच 7 नोव्हेंबर 2022 पासून iOS 16 बीटा सॉफ्टवेअर प्रोग्राम सुरू करणार आहे.

5G अपडेट लवकरच! ग्राहकांसाठी आनंदाची बातमी
1 ऑक्टोबर रोजी देशात 5G सेवा अधिकृतपणे सुरू झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Apple पुढील आठवड्यात आपल्या आगामी iOS चे बीटा अपडेट जारी करेल, ज्यामुळे भारतीय यूजर्सना 5G सेवा वापरता येईल. 5G चे स्टेबल अपडेटला डिसेंबरमध्ये रोलआऊट केले जाईल. यासंदर्भात कंपनीने C-DOT च्या सदस्यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांना बीटा अपडेट रोलआउटबद्दल माहिती दिली आहे. 

अ‍ॅपलचा टेलिकॉम कंपन्यांसोबत समन्वय
Apple 5G सेवेसाठी देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांशी समन्वय साधून काम करत आहे . कंपनीच्या म्हणण्यानुसार, नेटवर्क आणि गुणवत्ता चाचणी पूर्ण होताच, 5G शी संबंधित एक स्टेबल अपडेट जारी करू, जेणेकरून यूजर्स ही सेवा वापरू शकतील. 

Jio आणि Airtel यूजर्सना 5G सेवा मिळणार
बीटा प्रोग्राम अंतर्गत, जिओ आणि एअरटेलचे यूजर्स पुढील आठवड्यापासून 5G सेवा वापरण्यास सक्षम असतील. त्याचबरोबर आगामी iOS अपडेटमध्ये यूजर्सना नवीन फीचर्स देखील मिळतील.

या iPhones ला 5G सेवा मिळणार
iPhone 14 सीरीज
iPhone 13 सीरीज
iPhone 12 सीरीज
iPhone SE (3rd Generation)

Android यूजर्सही लवकरच 5G सेवा वापरू शकणार

मिळालेल्या माहितीनुसार, Apple व्यतिरिक्त, Xiaomi, Oppo, Vivo, Samsung आणि Realme त्यांच्या यूजर्सना 5G सेवा देण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट रोल आउट करण्याच्या तयारीत आहेत. असा अंदाज वर्तवला जात आहे की, 5G चे अपडेट या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला रिलीज केले जाईल. मात्र, कंपन्यांनी अद्याप या अपडेटबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.

 

 



Source link

Leave a Comment