Apple Ios 162 Beta Update For 5g Support In Iphone Rolled Out Jio 5g Airtel Tech Marathi News


iOS 16.2 Beta Release : Apple यूजर्ससाठी एक चांगली बातमी आहे, भारतातील 5G ​​सेवेची (5G Service) प्रतीक्षा अखेर संपली आहे, कारण Apple कंपनीने त्यांच्या फोनसाठी iOS 16.2 बीटा व्हर्जन रोल आऊट केले  आहे. हे अपडेट Jio आणि Airtel यूजर्ससाठी नुकत्याच लॉन्च केलेल्या 5G नेटवर्क वापरण्याची परवानगी देईल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, iPhone 14 सीरीज, iPhone 13 सीरीज आणि iPhone 12 सीरीज नवीन अपडेटच्या बीटा आवृत्तीशी अनुकूल आहेत

सध्या फक्त परीक्षक आणि डेव्हलपर्सपुरतेच मर्यादित

हे नवीन अपडेट फक्त परीक्षक आणि डेव्हलपर्सपुरतेच मर्यादित आहे, याचे कारण, त्यात काही दोष किंवा त्रुटी आहेत का? ते तपासण्यासाठी तसे करण्यात आले आहे. या दरम्यान, हे अपडेट  व्यवस्थित कार्य करत असल्याचे आढळल्यास, याबाबत एक फीडबॅक जारी केला जाईल. तुम्हाला ही बीटा आवृत्ती वापरायची असल्यास, तसेच तुमच्याकडे वैध Apple ID आणि iPhone असल्यास, तुम्हाला फक्त beta.apple.com वर जावे लागेल. त्यानंतर तयार केलेला लेआउट डाउनलोड करण्यासाठी beta.apple.com/profile वर जावे. फाइल डाउनलोड केल्यानंतर, Settings > General > सॉफ्टवेअर अपडेट निवडा आणि अपडेट डाउनलोड करा. परंतु काही जणांकडून असेही सुचविण्यात येते की तुम्ही याचे अपडेट सध्या करू नका, कारण याच्या अपडेटमध्ये बग आणि त्रुटी असू शकतात. ज्यामुळे तुमच्या दैनंदिन कामावर परिणाम होऊ शकतो.

Apple लवकरच एक OTA अपडेट जारी करेल

Reels

अलीकडेच, Bharti Airtel CTO रणदीप सेखॉन यांनी सांगितले की, Apple लवकरच एक OTA अपडेट जारी करेल. ज्यामध्ये सर्व iPhone यूजर्सना डिसेंबरमध्ये त्यांची 5G सेवा निवडण्याची आणि वापरण्यास अनुमती देईल.

 भारतातील iPhones वर 5G 

iOS 16.2 अपडेट या महिन्यासाठी बीटामध्ये जाईल आणि अपडेटचे स्टेबल व्हर्जन डिसेंबर 2022 पर्यंत रिलीज होण्याची अपेक्षा आहे. 5G सपोर्ट असलेले iPhone मॉडेल या नेटवर्कला सपोर्ट करतील. iPhone 12, iPhone 12 Mini, iPhone 12 Pro, iPhone 12 Pro Max, iPhone 13, iPhone 13 Mini, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max, iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max यांचा समावेश आहे. तर, iPhone SE 4th Gen 2024 मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. आणि ते 2018 पासून iPhone XR वर आधारित असू शकते. हा फोन 6.1-इंचाच्या एलसीडी डिस्प्लेसह मोठ्या नॉच आणि फेस आयडी सिस्टमसह येईल.

संबंधित बातम्या

5G in iPhone : iPhone मध्ये 5G सुरु, तुमच्या आयफोनमधील अपडेट असं चेक कराSource link

Leave a Comment