Announcing The App Store Award Winners The Best Apps And Games Of The Year Tech Marathi News

[ad_1]

App Store Award winners : Google नंतर, Apple ने भारतासाठी App Store च्या सर्वोत्कृष्ट अ‍ॅप्स 2022 ची यादी जारी केली आहे. या यादीमध्ये 2022 वर्षी एकूण 16 अ‍ॅप्स आणि गेम्सने या यादीत स्थान मिळवले.  

एकूण 16 अ‍ॅप्स आणि गेम्सचे या यादीत स्थान 
Apple ने मंगळवारी 2022 साठी App Store पुरस्कारांची घोषणा केली. अॅप स्टोअरच्या सर्वोत्कृष्ट अॅप्स आणि गेम्स 2022 च्या यादीमध्ये अॅप्स विभागात, फ्रेंच सोशल मीडिया अ‍ॅप, BeReal ने विजेते म्हणून स्थान मिळवले. त्याचप्रमाणे GoodNotes 5 हे या वर्षाचे आयपॅड अॅप बनले. MacFamilyTree 10 हे 2022 चे सर्वोत्कृष्ट मॅक अॅप निवडले गेले, ViX ची ऍपल टीव्ही अॅप म्हणून निवड झाली. 2022 साठी जेंटलर स्ट्रीक ऍपल वॉच अॅप म्हणून विजेते ठरले. गेमिंगमध्ये, ‘एपेक्स लेजेंड्स मोबाइल’ ला आयफोन गेम ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले. मॉनकेज हा iPad यूजर्समध्ये आवडता होता, 2022 साठी Inscryption हा Mac सर्वोत्कृष्ट गेम बनला, Apple TV वरील El Hijo ला सर्वाधिक पसंती मिळाली, Wylde Flowers ला Apple Arcade गेम ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आणि League of Legends Esports Manager 2022 चा चायना गेम विजेता ठरला.

 

अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक म्हणाले, “या वर्षीच्या अ‍ॅप स्टोअर पुरस्कार विजेत्यांनी नवीन, विचारशील, वास्तविक दृष्टीकोन आणि एक वेगळाच अनुभव अनुभवला आहे. “या पुरस्कार विजेत्या अ‍ॅप्सबाबत बोलायचे झाले तर, स्वत: शिकलेल्या एकट्या निर्मात्यांपासून ते जगभरात पसरलेल्या आंतरराष्ट्रीय टीमपर्यंत, हे उद्योजक अर्थपूर्ण प्रभाव पाडत आहेत. तसेच अॅप्स आणि गेम आपल्या जीवनावर कशाप्रकारे प्रभाव टाकतात याचाही अनुभव मिळाला,” 

News Reels

[ad_2]

Source link

Leave a Comment