Amazon Boss Jeff Bezos Announces He Is Giving Away Most Of His Money To Charity


Amazon Boss Jeff Bezos Money to Charity : ॲमेझॉनचे फाऊंडर ( Amazon Founder ) आणि मालक जेफ बेजोस ( Jeff Bezos ) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. जेफ बेजोस आपल्या संपत्तीचा मोठा भाग दान करणार असल्याचं एका रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नुकताच ॲमेझॉन कंपनीने अलिकडेच 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता बेजोस यांनी संपत्ती दान करण्याबाबत ही मोठी घोषणा केली आहे.

जेफ बेझोस संपत्तीचा मोठा भाग करणार दान

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या टॉप 5 यादीमध्ये जेफ बेझोस यांचा समावेश आहे. ॲमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांनी त्यांच्या संपत्ती बाबतचा मोठा खुलासा केला आहे. जेफ बेजोस यांनी मुलाखतीत सांगितलं आहे की, ते आपल्या संपत्तीचा मोठा भाग हवामान बदलाविरोधात लढण्यासाठी आणि उपाययोजनांसाठी दान करणार आहेत. सर्वांनी एकत्र येऊन मानवतेसाठी काम करण्याची गरज आहे, असंही बेझोस यांनी म्हटलं आहे. 

सहकारी लॉरेन सांचेज यांची घेणार मदत

जेफ बेजोस एका परदेशी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, त्यांचे सहकारी लॉरेन सांचेज (Lauren Sanchez) यांच्यासोबत त्यांनी संपत्ती दान करण्याची योजना आखली आहे. दरम्यान बेझोस नक्की किती टक्के संपत्ती दान करणार आहेत, याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यांनी सध्या संपत्ती दान करणार आहे, एवढीच माहिती दिली आहे.

‘द गिव्हिंग प्लेज’ मोहीमेसाठी सही न केल्यामुळे बेझोस यांच्यावर टीका

ॲमेझॉनच्या संस्थापकाने जेफ बेझोस यांनी हवामान बदलाशी लढा देण्यासाठी काम करणाऱ्यांसाठी संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे. बेझोस आपल्या संपत्तीचा मोठा भाग दान करणार आहे. दरम्यान, ‘द गिव्हिंग प्लेज’वर सही न केल्यामुळे बेझोस यांच्यावर अनेकदा टीका झाली आहे. ‘द गिव्हिंग प्लेज’ ही जगातील काही सर्वात श्रीमंत व्यक्तींनी त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग धर्मादाय कारणांसाठी दान करण्याची मोहीम आहे.

Reels

विचारपूर्वक घेणार निर्णय : जेफ बेझोस

जेफ बेझोस यांनी पुढे सांगितलं, जसं ॲमेझॉन कंपनीला जागतिक स्थान मिळवून देणं सोपं नव्हतं त्याप्रमाणेच दान करणंही त्यांच्यासाठी सोपं नाही. ॲमेझॉन कंपनीसाठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे. मी आणि माझा साथीदार लॉरेनने आता परोपकाराचा मार्ग निवडण्याचं ठरवलं आहे. हे काम करण्यासाठी आम्हाला काळजीपूर्वक विचार करावा लागेल, असंही बेझोस यांनी म्हटलं आहे.Source link

Leave a Comment