Acer Aspire 3 Laptop With Ryzen 5 7000 Series Processor Launched In India Know Price


Acer Aspire 3: Acer ने आपला नवीन लॅपटॉप Acer Aspire 3 भारतात लॉन्च केला आहे. हा कंपनीचा पहिला लॅपटॉप आहे, जो Ryzen 5 7000 सीरीज प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. याची बॉडी देखील खास आहे. कारण यात मेटलचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय मोठ्या स्क्रीनसह लॅपटॉपमध्ये 40Wh बॅटरी देण्यात आली आहे. लॅपटॉप विंडोज 11 वर काम करतो. याची किंमत 50 हजारांच्या आत आहे. कंपनीने आपल्या या लॅपटॉपमध्ये अनेक आधुनिक फीचर्स दिले आहेत. हा लॅपटॉप दिसायला देखील स्टायलिश असून याची क्वालिटी देखील मजबूत आहे. कंपनीने नेमके यात कोणते फीचर्स दिले आहेत, यामध्ये किती जीबी रॅम आणि स्टोरेज मिळेल? आणि याची किंमत किती असेल, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ…     

Acer Aspire 3 With Ryzen 7000 Series Processor Launched: Acer Aspire 3 चे स्पेसिफिकेशन 

Acer Aspire 3 लॅपटॉपची (upcoming laptops 2023) डिझाइन खूपच प्रभावी आहे. याचे वजन देखील जास्त नाही. याचे वजन फक्त 1.6 किलो इतके आहे. हा 18.9 मिमी जाड आहे आणि लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाचा FHD डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रिझोल्यूशन 1920 x 1080 पिक्सेल आहे. यासोबतच लॅपटॉपची स्क्रीन ब्लूलाइटशील्ड तंत्रज्ञानाला सपोर्ट करते. यात थर्मल मॅनेजमेंट सिस्टम देखील आहे. लॅपटॉपमध्ये (Acer Aspire 3 ) चांगल्या परफॉर्मन्ससाठी AMD Radeon ग्राफिक कार्ड, AMD Ryzen 5 7520U क्वाड-कोर प्रोसेसर, 8GB LPDDR5 रॅम आणि 512GB पर्यंत SSD स्टोरेज देण्यात आले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी लॅपटॉपमध्ये (Acer Aspire 3 ) ब्लूटूथ 5.1, WIFI 6E आणि HDMI 2.1 पोर्ट सारखी फीचर्स आहेत. इतकेच नाही तर या लॅपटॉपमध्ये 40Wh ची पॉवरफुल बॅटरी आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी वेबकॅम आहे.

Acer Aspire 3 With Ryzen 7000 Series Processor Launched: Acer Aspire 3 ची किती आहे किंमत?

Ryzen 5 7000 सीरीज प्रोसेसरसह Acer Aspire 3 लॅपटॉपची किंमत 47,990 रुपयांपासून सुरू होते. उपलब्धतेबद्दल सांगायचे तर, हा लॅपटॉप कंपनीच्या अधिकृत स्टोअर, वेबसाइटसह Amazon वरून खरेदी केला जाऊ शकतो.

Acer Aspire 3 With Ryzen 7000 Series Processor Launched: Galaxy Book 3 सीरीज 1 फेब्रुवारी रोजी लॉन्च होणार 

Samsung Galaxy Unpacked 2023 इव्हेंटमध्ये 1 फेब्रुवारी रोजी याचे Galaxy Book 3 सीरीज फ्लॅगशिप लॅपटॉप लॉन्च करणार आहे. या इव्हेंटपूर्वीच इव्हेंटमध्ये लॉन्च केल्या जाणार्‍या अनेक डिव्हाइसची माहिती अमोर आली आहे. यापैकी Galaxy Book 3 Pro 360 लॅपटॉप स्टायलससह येईल.

इतर महत्वाची बातमी: 

What is GB WhatsApp : डिलीट केलेले मेसेजही ‘या’ व्हॉट्सअॅपवरून वाचता येतात, GB WhatsApp तुमच्यासाठी किती आहे सुरक्षित?Source link

Leave a Comment