About One And A Half Hour Ad Shown On YouTube Company Gave A Shocking Reply To The User


Youtube Ads: गुगलचे (Google) व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म YouTube हे भारतातील लाखो लोक वापरतात. हा प्लॅटफॉर्म लोक फक्त व्हिडीओ पाहण्यासाठीच नाही, तर अनेक लोक याचा वापर पैसे कमावण्यासाठीही करतात. यातच तुम्ही जेव्हा YouTube वर व्हिडीओ पाहता, तेव्हा तुम्हाला त्यात जाहिरातीही पाहायला मिळतात. जर तुम्हाला जाहिरातमुक्त अनुभव घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला YouTube Premium चे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. पण पैसे खर्च न करता जे युट्युब एन्जॉय  करतात, त्यांना जाहिराती पहाव्याच लागतात. आतापर्यंत तुम्ही YouTube वर 5, 10, 15 किंवा 20 सेकंदांच्या जाहिराती पाहिल्या असतील. पण यादरम्यान एका युजरने यूट्यूबवर दीड तासाची जाहिरात पाहिली, ज्यावर युजरने यूट्यूब जाहिरात व्हिडीओचा स्क्रीनशॉट शेअर करून यूट्यूबकडे उत्तर मागितले आहे. यावर कंपनीचं उत्तर वाचून तुमचं डोकं फिरेल, काय म्हणाली कंपनी जाणून घेऊ. 

YouTube ने दिल हे उत्तर 

एका युजरने केलेल्या ट्विटला उत्तर देताना, YouTube ने सांगितले की सध्या जाहिरातीच्या लांबीवर कोणतीही मर्यादा नाही. म्हणजे जाहिराती किती लांब असू शकतात. यूट्यूबने सांगितले की, युजर्स इच्छित असल्यास जाहिरात स्किप करू शकतात. पण जर कोणाला असं करता येत नसेल तर आम्हाला त्याबद्दल कळवा. YouTube Non-Skippable Add साठी किमान वेळ 15 ते 20 सेकंद आहे. यूट्यूबच्या या ट्विटवरून हे स्पष्ट झाले की, यूट्यूबवर जाहिरातींच्या लांबींवर कोणतीही मर्यादा नाही नाही. याचा अर्थ तुम्ही त्यावर मोठ्या जाहिराती देखील पाहू शकता परंतु त्या तुम्ही स्किप करू शकता.

Youtube Ad-Free Extension : अशा प्रकारे तुम्ही प्रीमियमशिवाय जाहिरातमुक्त व्हिडीओ पाहू शकता

तुम्हाला YouTube Premium न खरेदी करता जाहिरातमुक्त व्हिडीओ पाहायचे असतील, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या PC वर Youtube Ad-Free Extension डाउनलोड करावा लागेल. जर तुम्हाला ही सुविधा मोबाईलवर हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी अॅप्लिकेशन वापरावे लागेल.

Watch Ad-Free Videos on This Browser: या ब्राउझरवर पाहा जाहिरातमुक्त व्हिडीओ 

जाहिरातमुक्त व्हिडीओ पाहण्यासाठी तुम्ही ब्रेव्ह ब्राउझर देखील वापरू शकता. हा ब्राउझर गुगल क्रोम आणि इतर ब्राउझरपेक्षा अधिक सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. तुम्ही मोबाईल फोनवर अॅपल अॅप स्टोअर किंवा Google Play Store वरून ते सहजपणे डाउनलोड करू शकता.

 

Source link

Leave a Comment