200 Million Twitter Users Email Addresses Allegedly Leaked Online


Twitter Safety Breach : ट्विटर युजर्ससाठी मोठी बातमी आहे. ट्विटर युजर्सचा डेटा चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. सिक्योरिटी रिसर्चर रिपोर्टच्या दाव्यानुसार, 200 दशलक्षहून अधिक ट्विटर युजर्सचा ईमेल आयडी चोरीला गेला आहे. हॅकरने युजर्सचे ई-मेल आयडी चोरून ते एका ऑनलाइन फोरममध्ये पोस्ट केले आहेत. ब्रीच-नोटिफिकेशन साइट हॅव आय बीन प्वेन्डचे निर्माते ट्रॉय हंट यांच्या माहितीनुसार, 200 दशलक्ष ट्विटर युजर्सचा ईमेल आयडी चोरीला गेला आहे.

200 दशलक्ष ट्विटर युजर्सचा डेटा चोरीला

इस्त्रायली सायबर सिक्युरिटी-मॉनिटरिंग फर्म हडसन रॉकचे सह-संस्थापक एलोन गॅल यांनी लिंक्डइन पोस्ट करत म्हटले आहे की, ‘फार मोठ्या प्रमाणात माहिती चोरीला गेली आहे. दुर्दैवाने या घटनेमुळे बरेच हॅकिंग, टार्गेट फिशिंग आणि डॉक्सिंग या घटनांमध्ये वाढ होईल.’ गॅल यांनी 24 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर ट्विटर युजर्सचा डेटा लीक झाल्याबद्दल पोस्ट करत माहिती दिली होती. गॅल यांनी त्यावेळी सांगितलं होते की, ‘मोठ्या प्रमाणात ट्विटर युजर्सची माहिती चोरीला जात आहे. ट्विटरने या समस्येची चौकशी किंवा समस्या सोडवण्यासाठी काय कारवाई केली आहे, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.’

 Source link

Leave a Comment